घरमहाराष्ट्रपक्ष आपला ठाकरे..., दसरा मेळाव्याचा नवा टीझर ठाकरे गटाकडून जारी

पक्ष आपला ठाकरे…, दसरा मेळाव्याचा नवा टीझर ठाकरे गटाकडून जारी

Subscribe

मुंबई : शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा उद्या, मंगळवारी दसरा मेळावा होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. या मेळाव्यासाठी काही तास शिल्लक राहिले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक नवा टीझर जारी केला आहे. ‘दैवत आपलं ठाकरे’ असे सांगणारा हा टीझर जोरदार बनला आहे.

हेही वाचा – ‘हे’ धोरण इस्रायलने भारताकडून स्वीकारले की…? ठाकरे गटाचा भाजपाला टोला

- Advertisement -

दसऱ्याच्या दिवशी तमाम शिवसैनिकांचे लक्ष शिवतीर्थावरील मेळाव्याकडे असते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे याचे घणघणाती भाषणाने भारावलेले शिवसैनिक सभा आटोपल्यानंतर मैदानातून बाहेर पडत असत. मात्र गेल्यावर्षीपासून हा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जून 2022मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी ‘उठाव’ केल्याने शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावणी घेतल्यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला सोपविले. पण दसरा मेळाव्याचा वाद कायम राहिला. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचा कौल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दिला. त्यामुळे ठाकरे गटाचा दसरा मेळावा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावरच होणार आहे.

- Advertisement -

या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काल, रविवारी एक टीझर जारी केला होता. ‘दिवस तोच, गर्दी तीच, जल्लोष तोच, मैदान तेच…’ असे सांगत एकनिष्ठ शिवसैनिकांचा हा दसरा मेळावा असल्याचे ठाकरे गटाने त्यात अधोरेखित केले आहे. त्यापाठोपाठ आज, सोमवारी ठाकरे गटाने आणखी एक टीझर जारी केला आहे. ‘पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आन-बान-शान ठाकरे…’ फडकत्या गीतावर आधारित या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील काही अंशही देण्यात आले आहेत. बाळासाहेबांच्या भाषणातील, आपल्या रक्तात सळसळता भगवा रंग फिका पडू देणार नाही, या वाक्याचा समावेश करून हिंदुत्वाचा हुंकार ठाकरे गटाने भरला आहे. फुटलेल्या आमदाराला कायद्याची परवा न करता रस्त्यात तुडवा, असे आदेश देतानाही बाळासाहेब दिसत आहेत. याशिवाय, मला सांभाळलेत, त्याप्रमाणे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना साभाळून महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घेण्याचे आवाहनही बाळासाहेबांनी केल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा – ड्रग्ज प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचे देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; “गृहमंत्री करतात…”

‘ठाकरे’ ह्या नावाची ताकदच अशी आहे की, ते नाव पाठीशी असल्यावर जगातील कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायची शक्ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनगटात येते. कधीही न आटणारा उर्जेचा आणि मायेचा स्रोत म्हणजेच तमाम निष्ठावान शिवसैनिकांचे दैवत ‘ठाकरे’! याच दैवतावरच्या प्रेमापोटी शिवसैनिकांनी अर्पण केलेले हे नवीन गीत… ‘दैवत आपलं ठाकरे’, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -