घरदेश-विदेशआता नुपूर शर्मांनाही मोदींचे आशीर्वाद...; टी.राजांच्या उमेदवारीवरून ओवैसींचा संताप

आता नुपूर शर्मांनाही मोदींचे आशीर्वाद…; टी.राजांच्या उमेदवारीवरून ओवैसींचा संताप

Subscribe

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 52 उमेदवारांची नावे समोर आली आहेत.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणजे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका. केंद्रीय निवडणूक विभागाने या पाचही राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर भाजप, कॉंग्रेससह केसीआर यांचा BRS पक्षही प्रचारात गुंतला आहे. यामध्ये मग ओवैसी कुठे मागे राहणार. त्यांनीही प्रचार सुरू केला असून, यावेळी मात्र, त्यांनी भाजपने तेलंगणात टी. राजा यांना उमेदवारी घोषित केल्यांने संताप व्यक्त केला आहे. (Now Modis blessings to Nupur Sharma too… Owaisis anger over T Rajas candidacy)

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 52 उमेदवारांची नावे समोर आली आहेत. पक्षातून निलंबित करण्यात आलेले आमदार टी. राजा सिंह यांनाही तिकीट देण्यात आले आहे. राजा यांनी मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावणारी टिप्पणी केली होती, त्यानंतर पक्षाने त्यांना ऑगस्ट 2022 मध्ये निलंबित केले होते. मात्र टी. राजा यांना पुन्हा तिकीट दिल्याने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी संतापले. नुपूर शर्मा यांनाही पीएम मोदींचा आशीर्वाद मिळेल, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले ओवेसी?

भारतीय जनता पार्टीने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर ओवैसी यांनी X (पूर्वीचे ट्वीटर) वर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भाजपमध्ये द्वेष पसरवणाऱ्यांना झटपट बढती मिळते. मला खात्री आहे की, नुपूर शर्मा यांनाही पंतप्रधानांचे आशीर्वाद मिळतील. नुपूर शर्माने गेल्या वर्षी मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावणारी टीप्पणी केली होती. त्यानंतर तिला भाजपमधून निलंबित करण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा : अब्दुल सत्तार चले जाओ! गावकऱ्यांनी सत्तारांविरोधात केली घोषणाबाजी, कारण काय?

कोण आहेत टी. राजा ?

टी. राजा हे हैदराबादमधील भाजपाचा हिंदुत्त्ववादी चेहरा असून, हिंदूत्व आणि वादग्रस्त विधानांसाठी ते कायम चर्चेत असतात. यापूर्वी, भाजपाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन केले होते. मात्र, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते निलंबन मागे घेण्यात आले.

हेही वाचा : …त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले, पवारांवरांच्या ‘त्या’ टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर

टी. राजा यांनी पक्षाचे आभार मानले

मुस्लीम धर्मींयाबाबत केलेल्या वादग्रस्त टीप्पणीनंतर पक्षाने टी. राजा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र, आता तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने टी. राजा यांच्यावर मेहरबानी दाखवत उमेदवारी बहाल केली आहे. पक्षाने दाखवलेल्या या उदारमतवादी धोरणामुळे टी. राजा यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, माझे निलंबन मागे घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, बीएल संतोष, राज्य भाजप प्रमुख जी. किशन रेड्डी आणि के. लक्ष्मण यांचे आभार मानतो. मला गौसमहालमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया टी. राजा यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -