घरक्राइमThane : ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांच्यावर फसवून हल्ला, शाईफेक, मारहाण; पोलिसांत तक्रार

Thane : ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांच्यावर फसवून हल्ला, शाईफेक, मारहाण; पोलिसांत तक्रार

Subscribe

 

ठाणेः ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर कळवा येथे शुक्रवारी संध्याकाळी हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली. अयोध्या पौळ यांनी याची पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही तर आम्ही काय करायचं ते बघू असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

- Advertisement -

अयोध्या पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा येथे त्यांना एका कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होतं. निमंत्रणानुसार त्या कार्यक्रमाला गेल्या. मला तेथे माझ्या ओळखीचं कोणचं दिसलं नाही. तेथे शंभर दीडशे महिला होत्या. चार मुलं होती. मला थोडा संशय आला. मी तेथून जाण्याचा प्रयत्न केला. पण ते मला म्हणाले की आता तुम्ही महापुरुषांच्या कार्यक्रमात आलाय मग तसेच जाणार का? मी म्हटलं नाही आता आले तर करून जाणार, असे पोळ यांनी तेथील उपस्थितांना सांगितले.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला का हार घातला, असा जाब त्यांनी मला विचारला. तुम्ही अपमान केला, असे म्हणून एका सेकंदांत शाईची पूर्ण बॉटल माझ्या अंगावरती टाकली दुसरीने मला मारलं, मी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. त्यांना मला अडवल. जाऊ दिलं नाह. एका बाजूला टेबल लावलेला होता आणि टेबलच्या बाजूला बाईक होती. त्यामुळे मी टेबलवर उडी मारून पण जाऊ शकत नव्हते. या घटेननंतर मी थेट पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार दिली. तक्रार देऊन पोलीस ठाण्याच्या बाहेर पडल्यावर पुन्हा मला मारहाण करण्यात आली, असे पौळ यांनी सांगितले.

 

माझी लढाई संविधानिक

मी आणि माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे आणि मी ती लढेल. आज माझा शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार आणि लाखो शिवसैनिक माझ्या सोबत आहे, असे ट्वीट पौळ यांनी केले.

फसवणूक करून शाईफेक केली

फसवणूक करून मला कार्यक्रमाला बोलावून माझ्यावर शाईफेक करण्यात आली. मारहाण करण्यात आली. कट रचून हे सर्व करण्यात आलं. सोशल मीडियावर मी सतत ठाकरे गटाची बाजू मांडत असते. म्हणूनच मला टार्गेट करण्यात आलं. असा हल्ला झाला म्हणून मी घाबरणार नाही. मी माझे काम करतच राहणार, असे पौळ यांनी सांगितलं.

पोलिसांनी कारवाई केली नाही तर…

ठाकरे गटाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अयोध्या पौळ यांच्यावर झालेला हलल्ला दुर्दैवी आहे. कट रचून पोळयांना बोलवण्यात आलं.पोलिसांत याची तक्रार दिली आहे. पोलीस याची सखोल चौकशी करतील, असा आम्हाला विश्वास आहे. पण रितसर कारवाई झाली नाही तर आम्ही काय करायचं ते बघू, असा निर्वाणीचा इशारा ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी दिला आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -