घरमहाराष्ट्रलपवलेल्या ८६२ करोना बळींपैकी ७०८ बळी चहल यांच्या काळातील, परदेशींच्या काळातील १५४

लपवलेल्या ८६२ करोना बळींपैकी ७०८ बळी चहल यांच्या काळातील, परदेशींच्या काळातील १५४

Subscribe

एप्रिल १५४, मे ५६०, जून १४८ = ८६२ लपवलेले बळी

राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या मागील तीन महिन्यांतील मुंबईतील ८६२ करोनाचे बळी हे माजी महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्या काळातील की विद्यमान पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या काळातील याचा ‘आपलं महानगर’ने शोध घेतला असता त्यातील ७०८ बळी चहल यांच्या काळातील तर १५४ बळी परदेशी यांच्या काळातील असल्याचे आकडेवारीवरुन दिसतेय.

गेल्या काही दिवसांत करोनाचे बळी कमी दाखविण्याबाबत सर्वच स्तरांतून आरडाओरड होत असताना विशेषत: अनेक सनदी अधिकार्‍यांनी यामध्ये लक्ष घातल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्ता म्हणून मला एकही करोना रुग्ण लपवायचा नाही, अशी भूमिका घेतली. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, त्यांना मिळालेल्या अधिकृत आकडेवारीवरुन ठाकरे सरकारला घेरल्यामुळे सोमवार आणि मंगळवारी पालिका आणि मंत्रालयात यंत्रणा, हातातील सर्व कामे बाजूला सारुन करोना बळी असूनही नोंद न केलेल्या बळींची नावे आणि आकडेवारी काढण्यात कमालीची बिझी होती. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात किती रुग्णांचा करोनाने बळी गेला याची खरी माहिती आहे. मृत्यू दाखल्यावर कोविड पॉझिटिव्ह असा उल्लेख असतानाही मुंबईतील डेथ ऑडिट कमिटीने करोनाने बळी होवूनही ती आकडेवारी राज्याच्या पुणे येथे कार्यालयाला का पाठवली नाही? झारीतील शुक्राचार्य कोण, असे सवाल आता मुंबई महापालिकेतून केले जात आहेत.

- Advertisement -

राज्य सरकारने मंगळवारी मुंबई महापालिकेतील मागील तीन महिन्यांतील ८६२ करोना मृत्यू आणि राज्यातील इतर जिल्ह्यात ४६६ मृत्यू असे एकूण १३२८ मृत्यू करोनानेच जाहीर झाल्याची कबुली दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नोंद न झालेले ८६२ करोना मृत्यू एकाच दिवशी म्हणजे १६ जूनला दाखविले गेले. त्यामुळे ८६६ जुने करोना मृत्यू आणि त्या दिवशी झालेले खरे ७९ मृत्यू असे मिळून ९४१ मृत्यू एकाच दिवशी झाल्याचा रेकॉर्ड मुंबई महापालिकेत घडला. मात्र ८६२ मृत्यू कोणाच्या कालावधीत झाले? ते कोणत्या वॉर्डातील आहेत? त्यात पुरूष आणि स्त्रिया किती? याबाबत राज्य सरकारकडून अळीमिळी गूपचिळी असा प्रकार सुरू आहे. याबाबत मुख्य सचिव अजोय मेहता, आयुक्त इकबाल सिंह चहल हे स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाहीत. पालिकेत असणारे डझनभर आयएएस अधिकारी, मंत्रालयात आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास, तसेच करोना नियंत्रण कक्षाची जबाबदारी असणारे वरिष्ठ अधिकारी यांनी तोंडावर बोट ठेवत याबाबत माजी आयुक्त प्रविण परदेशी आणि विद्यमान पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुख्य सचिव अजोय मेहता यांनाच विचारा अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारमधील सनदी अधिकार्‍यांमध्ये सारे काही आलबेल नाही, याची प्रचिती मागील तीन महिन्यांपासून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची आठ मे रोजी तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी १९८९ च्या बॅचचे इकबाल सिंह चहल आले. करोनाचा संसर्ग १७ मार्चपासून मुंबईत सुरू झाला. त्यामुळे १७ मार्च ते ८ मेपर्यंत करोनाने झालेले बळी हे आयुक्त परदेशी यांच्या काळातील आहेत; तर ९ मे ते आजपर्यंतचे करोनाने झालेले मृत्यू हे चहल यांच्या काळातील आहेत. मुंबईत करोनाने पहिला बळी १७ मार्च रोजी घेतला. दुबईहून आलेल्या रुग्णचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे १७ मार्च ते ८ मे पर्यंतच्या ४६२ एवढ्या अधिकृत बळींमध्ये १५४ बळी हे परदेशी यांच्याकाळातील नोंद न झालेले आहेत. तर ९ मे ते १५ जूनपर्यंत २२४८ करोना बळींची नोंद ही चहल यांच्या काळातील आहे.

- Advertisement -

त्यामुळे ४६३ करोना बळी ते २२४८ पर्यंतचे बळी हे चहल यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात अधिकृत झाले. त्यात मे महिन्यातील ५६० आणि जून महिन्यातील १४८ असे मिळून ७०८ करोनाच्या बळींची नोंद डेथ ऑडिट कमिटीने केलेली नसल्याचे ‘आपलं महानगर’कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरुन लक्षात येते. मंगळवारी राज्यसरकारने जाहीर केलेल्या ८६२ करोना मृत्यूंमध्ये नोंद न केेलेले मृत्यू आयसीएमआरच्या गाईडलाइननुसार का दाखवले नाहीत? डेथ ऑडिट कमिटी कुणाच्या दबावाखाली काम करत होती? राज्याच्या आरोगय विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी मुंबई महापालिकेला कारणे दाखवा नोटीस का काढली नाही? आरोग्य सचिव प्रदीप व्यास गप्प का बसले? याबाबत पालिका आणि मंत्रालय पातळीवर कमालीची शांतता आहे.

महत्वाची बाब म्हणजे करोना बळींची माहिती राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी पाठविलेल्या सर्व महापालिका, जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रात आठवड्याभरात मृत्यूचे निदान होणे आवश्यक असल्याचे सांगूनही महिनोंमहिने कोविड पॉझिटिव्ह मृत रूग्णांची माहिती लपविल्याबद्दल आता संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे आरोग्य विभागाप्रमाणे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची आठ मे रोजी तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी १९८९ च्या बॅचचे इकबाल सिंह चहल आले. करोनाचा संसर्ग ८ मार्चपासून मुंबईत सुरू झाला. त्यामुळे ८ मार्च ते ८ मेपर्यंत करोनाने झालेले बळी हे आयुक्त परदेशी यांच्या काळातील आहेत; तर ९ मे ते आजपर्यंतचे करोनाने झालेले मृत्यू हे चहल यांच्या काळातील आहेत. मुंबईत करोनाने पहिला बळी १७ मार्च रोजी घेतला. दुबईहून आलेल्या रुग्णाचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे १७ मार्च ते ८ मे पर्यंतच्या ४६२ एवढ्या अधिकृत बळींमध्ये १५४ बळी हे परदेशी यांच्याकाळातील नोंद न झालेले आहेत. तर ९ मे ते १५ जूनपर्यंत २२४८ करोना बळींची नोंद ही चहल यांच्या काळातील आहे. त्यामुळे ४६३ करोना बळी ते २२४८ पर्यंतचे बळी हे चहल यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळातील असल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -