घरमुंबईCoronavirus: गेल्या २४ तासांत मुंबईत १,३५९ कोरोनाचे नवे रुग्ण, ७७ जणांचा मृत्यू!

Coronavirus: गेल्या २४ तासांत मुंबईत १,३५९ कोरोनाचे नवे रुग्ण, ७७ जणांचा मृत्यू!

Subscribe

आज २९८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत मुंबईत ३१ हजार ३३८ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईत मागील २४ तासांत १ हजार ३५९ कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१ हजार ५०१ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ३ हजार २४२ झाली आहे. तसेच आज २९८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत मुंबईत ३१ हजार ३३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

- Advertisement -

७७ मृत रुग्णांपैकी ५३ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील ५९ रुग्ण पुरुष आणि १८ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ७ जणांचे वय ४० वर्षाखाली होते, ४३ जणांचे वय ६० वर्षांवरील होते, तर उर्वरित २७ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

मुंबईत आज दिवसभरात कोरोना व्हायरसच्या एकूण २ लाख ६९ हजार ६०८ चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान १० जून ते १६ जून पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना व्हायरस वाढीचा दर हा २. ४३ टक्क्यांवर असल्याचे देखील मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.


Coronavirus Update: राज्यात ३३०७ नवे रुग्ण; ११४ जणांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -