घरमहाराष्ट्रभीमा-कोरेगाव प्रकरणी आरोपींना जामीन नाही

भीमा-कोरेगाव प्रकरणी आरोपींना जामीन नाही

Subscribe

भीमा-कोरेगाव षडयंत्राच्या आरोपींना जामीन देऊ नये अशी मागमी राज्य सरकाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

भीमा-कोरेगाव षडयंत्र प्रकरणी अटकेत असलेले सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन यांच्यासह इतर आरोपींना जामीन देऊ नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारने आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी हिंसाचाराचे षडयंत्र रचल्याबद्दल पोलिसांनी सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, सुधीर ढवळे, सोना विल्सन आणि महेश राऊत या नक्षल समर्थकांना अटक केली आहे. या आरोपींनी जामिनासाठी अर्ज केले असून त्यांना जामीन दिला जाऊ नये अशी विनंती राज्य सरकारतर्फे न्यायालयाला करण्यात आली आहे.

प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट

भीमा-कोरेगाव प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत असून हे प्रकरण अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याप्रकरणी अर्धवट दोषारोपत्र दाखल झाले असेल तर मला जामीन मिळण्याचा अधिकार असल्याचे एल्गार व कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी अ‍ॅड. सुरेद्र गडलिंग यांने न्यायालयात सांगितले होते. मात्र, सुरेंद्र गडलिंग आणि इतर आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे आहेत. त्यामुळे तांत्रिक बाबींचे कारण देतही त्यांना जामीन देऊ नये, अशी विनंती केली आहे.

- Advertisement -

तिघांना अटक

भीमा कोरेगाव प्रकरणी नागपुरातील सुरेंद्र गडलिंग यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. गडलिंग यांच्यासोबत सुधीर ढवळे व शोमा सेन यांनाही अटक करण्यात आली होती. एल्गार परिषदेत प्रक्षोभग भाषणे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना पुणे पोलिसांनी यापूर्वी त्यांच्या घरावर छापे मारले आहेत. त्यात गडलिंग यांच्या घराचीही झडती घेण्यात येऊन काही दस्तावेज, पेनड्राईव्ह, सीडी, डिव्हीडी व हार्ड डिस्क जप्त करण्यात आले होते. जरिपटका येथील त्यांच्या निवासस्थानावरून त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणाची सुनावणी जानेवारी २०१९ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -