घरमहाराष्ट्रपुरामुळे नाशिक, पुण्यातून भाज्यांची आवक घटली

पुरामुळे नाशिक, पुण्यातून भाज्यांची आवक घटली

Subscribe

भाजीपाल्यांचे दर दुपटीने वाढले, गृहिणींच्या बजेटला धक्का

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणासह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक जिल्ह्यांतील शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी भाजीपाल्याची आवक घटल्याने शहरी भागात भाज्यांचे दर कडाडले आहेत. पालेभाज्यांच्या दरात किमान दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे.

मुंबईतील बाजारपेठेत प्रामुख्याने नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांतून भाज्यांची आवक होते, मात्र या जिल्ह्यांमध्ये मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एका बाजूला भाजीपाल्याचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे, तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या वाहतुकीतही अडथळे येत आहेत. त्यामुळे शहरी भागातील भाजीपाल्याची आवक घटली आहे. कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये दरदिवशी २५० ते ३०० वाहनांतून भाज्यांची आवक होते, मात्र पावसामुळे केवळ १५० वाहनांमधूनच सध्या भाज्यांची आवक होत आहे. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीलाही पावसाचा फटका बसला आहे.

- Advertisement -

बदलापूरमधील भाजी विक्रेते नगर, नाशिक, पुणे तसेच कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधून भाज्यांची खरेदी करतात. या भाजी विक्रेत्यांनाही महागाईची झळ सहन करावी लागत आहे.

असे आहेत भाज्यांचे दर

कोथिंबीर ५० रुपये जुडी, पालक ३० रुपये जुडी, मेथी ३५ रुपये जुडी, शिमला ८० रुपये, बटाटे ३५ रुपये, वांगी ८० रुपये, गवार ८० रुपये, तर भेंडी ९०-१०० रुपये प्रतिकिलो.

- Advertisement -

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्या लवकर खराब होत असल्याने पालेभाज्यांची आवक घटली आहे. येत्या काळात भाजीपाल्याचे दर अजून वाढू शकतात. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तसेच भाज्यांचे दर वाढल्याने व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
-नाना वाणी, भाजी विक्रेते, बदलापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -