घरमहाराष्ट्रराजगुरुंच्या स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

राजगुरुंच्या स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

Subscribe

देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी राजगुरु यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र, त्यांच्या सामारकाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे राजगुरुप्रेमींनी नाराजी व्यक्ती केली आहे.

छोडो भारत आंदोलनात आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ९ ऑगस्टला ‘ऑगस्ट क्रांती दिन’ साजरा केला जातो. याच दिवशी अनेक इतिहास रचले गेले आहेत. त्यातील आणखी एक महत्वाचा इतिहास म्हणजे ‘काकोरी खजिना लूट’. ९ ऑगस्ट १९२४ रोजी काकोरी खजिना लुटला गेला होता, त्यामुळे या दिवसाला ‘काकोरी लूट’ दिवसही म्हटले जाते. काकोरी लुटण्यामध्ये भगतसिंग देखील होते. पुढे स्वातंत्र्यसंग्राम लढ्यात भगतसिंग यांनी अनेक तरुणांना सोबत घेतले. महाराष्ट्राच्या खेड तालुक्यातील शहिद राजगुरु देखील या लढ्यात भगतसिंग यांच्यासोबत जोडले गेले. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी राजगुरूंनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र, त्याच राजगुरुंची महाराष्ट्र सरकारकडून उपेक्षा केली जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राजगुरू यांच्या स्मारकाचा विषय अडगळीत पडला होता. सरतेशेवटी स्मारकाचे बांधकाम सुरु झाले. मात्र ते ही निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले आहे.

काय आहे प्रकरण?

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे क्रांतिकारक राजगुरु यांच्या स्मारकाच्या कामाला मागील तीन महिन्यांपासून सुरुवात करण्यात आली आहे. या स्मारकासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. यामध्ये राजगुरुनगर नगरपरिषद, खासदार शिवाजी आढळराव यांच्या फंडातून निधी उपलब्ध करुन कामाला सुरुवात करण्यात आली. काम चांगले होण्यासाठी आदेशही देण्यात आले. मात्र काम करणाऱ्या ठेकेदाराने कामाकडे दुर्लक्ष केले असून काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे राजगुरुप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या कामात आरसीसी स्ट्रक्चर, भिंतीचे काम निकृष्ट होत असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. राजगुरुंच्या जन्मभूमीत ‘जन्मस्थळ स्मारका’च्या कामातही भष्ट्राचार झाला होता. आता स्मारकाचे कामही निकृष्ट होत असल्याने क्रांतीकारकांच्या इतिहासाला काळीमा फासला जात असल्याचे म्हणावे लागेल.

- Advertisement -

कामाची पाहणी त्वरीत केली जाईल – अधिकारी

याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता चंद्रकांत नाईक यांच्याशी माय महानगरने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, ‘हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असेल, तर त्या कामाची पहाणी त्वरीत केली जाईल’. त्याचबरोबर जर यामध्ये कुणीही दोषी आढळून आले तर त्यांना माफ केले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

स्मारकाच्या निकृष्ट बांधकामाचे फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -