घरताज्या घडामोडीमुलगी पळून गेल्याच्या धसक्यात कुटुंबाची आत्महत्या

मुलगी पळून गेल्याच्या धसक्यात कुटुंबाची आत्महत्या

Subscribe

आई- वडिलांसह भावाने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

मुलगी पळून गेल्याच्या धसक्यात मुलीच्या कुटुंबियांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली येथे घडली आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. आई- वडीलांसह मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तरुण मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्क्याने आणि लोक काय म्हणतील या भीतीने या कुटुंबाने आत्महत्या केल्याचं बोललं जातंय.

रवींद्र नागोराव वरगंटीवार ( वडील), वैशाली रवींद्र वरगंटीवार( आई) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार ( मुलगा) या तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हे कुटुंब मूळचे अमिर्झा या गावातील असून काही वर्षांपासून गडचिरोलीमध्ये भाड्याने राहत होते.

- Advertisement -

रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे वरगंटीवार कुटुंब नैराश्यग्रस्त झालं होतं. त्यामुळे, या कुटुंबाने सोमवारी दुपारच्या सुमारास विहिरीत वडील, आई आणि मुलाने एकापाठोपाठ उड्या घेऊन जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकणी पोलीस अधिक तपास करत आहे.

नेमकं काय घडलं ?

कॉन्व्हेंट शाळेत शिक्षिका असलेल्या मुलीने आपण प्रेमविवाह करणार असल्याची पूर्वकल्पना घरच्यांना दिली होती. पण, आई वडिलांचा विरोध असल्याकारणाने ही मुलगी शनिवारी घरुन सोडून निघून गेली. याचा मानसिक धक्का कुटुंबियांनी घेतला. त्याच धक्क्यात कुटुंबातील तिघांनी घरामागे असलेल्या विहिरीत उडी घेतली आणि जीवन संपवलं असं सांगितलं जातंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -