घरमहाराष्ट्रवंचित बहुजन आघाडीचा मुंबईतला पहिला उमेदवार जाहीर

वंचित बहुजन आघाडीचा मुंबईतला पहिला उमेदवार जाहीर

Subscribe

वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील ६ मतदारसंघांपैकी पहिल्या उमेदवाराचं नाव जाहीर झालं आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून डॉ. संजय भोसले यांच्या नावाची घोषणा दक्षिण मध्य मुंबईतून करण्यात आली आहे. राज्यभरातल्या ४८ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याचं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केल्यानंतर आता मुंबईतल्या ६ मतदारसंघांपैकी पहिल्या उमेदवाराचं नाव जाहीर झालं आहे. त्यामुळे आता दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्याशी संजय भोसले यांची लढत होणार आहे.

उमेदवारीच्या माध्यमातून गरीब वर्गासाठी जास्त काम करता येईल. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करू. विजय होईल की पराजय माहीत नाही, पण प्रयत्न नक्की करू.
– डॉ. संजय भोसले, उमेदवार, वंचित बहुजन आघाडी

काँटे की टक्कर

दरम्यान, या मतदारसंघाकडे पाहिलं, तर शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्यासोबतच काँग्रेसकडून एकनाथ गायकवाड किंवा भालचंद्र मुणगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तगड्या आव्हानासमोर संजय भोसले कोणत्या पद्धतीने प्रचार करणार? हा खरा औत्सुक्याचा विषय आहे. विधानसभेतील आमदार संख्या, पक्षीय इतिहास, जनसंपर्क या सगळ्या मुद्द्यांमध्ये एकच बाब भोसले यांच्या बाजूने आहे आणि ती म्हणजे या मतदारसंघात असलेलं दलित आणि मुस्लिम मतदारांचं मोठं प्रमाण. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम पक्ष यांच्या प्रभावाखाली ही मतं आणण्यात वंचित बहुजन आघाडीला यश आलं, तर इथे काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते.

- Advertisement -
dr. sanjiv bhosle
डॉ. संजय भोसले

‘तर सेना-भाजपचे कार्यकर्तेही मला मत देतील!’

सेना-भाजपचे उमेदवार असूनही आम्ही जागा लढवतोय हे कळलं तर त्यांचे कार्यकर्ते देखील मला मत देतील असा प्रबळ आशावाद यावेळी भोसले यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केला.


हेही वाचा – वंचित बहुजन आघाडीचा मुंबईतला पहिला उमेदवार जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -