Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE पहिला डोस कोविशिल्ड, दुसरा कोव्हॅक्सिनचा? पर्यावरण राज्यमंत्र्यांचे आरोप जेजे रुग्णालयाने फेटाळले

पहिला डोस कोविशिल्ड, दुसरा कोव्हॅक्सिनचा? पर्यावरण राज्यमंत्र्यांचे आरोप जेजे रुग्णालयाने फेटाळले

Related Story

- Advertisement -

मला जेजे रुग्णालयात लसीचा पहिला डोस कोव्हीशीलडचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा देण्यात आला, असा गंभीर दावा पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केला. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हा दावा जेजे रुग्णालयाने फेटाळला आहे. पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे, असं जेजे रुग्णालयाने म्हटलं आहे.

संजय बनसोडे अधिवेशनानिमित्त मुंबईत होते. त्यावेळी त्यांनी जेजे रुग्णालयात पहिला डोस सिरम कंपनीच्या कोव्हिशिल्डचा घेतला होता. शुक्रवारी लसीचा दुसरा डोस त्यांनी घेतला. काल जो डोस त्यांना देण्यात आलेला होता तो कोव्हॅक्सिनचा म्हणजेच भारत बायोटेक कंपनीचा होता, असा दावा संजय बनसोडे यांनी केला. काल संजय बनसोडे यांना लस घेतल्या नंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लस देणाऱ्या नर्सला कोणती लस दिली असा सवाल केला असता नर्सने कोव्हॅक्सिनचा दिल्याची माहिती दिली. “मला चुकीची लस दिली त्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो. मी मंत्री आहे, मला वाचता येतंय म्हणून मला लक्षात आलं. अशिक्षित, ज्याम वाचता येत नाही त्या माणसाचं कसं होणार?” असा सवाल बनसोडे यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, संजय बनसोडे यांच्या गंभीर दाव्यानंतर वैद्यकीय संचालक तात्याराव लहाने आणि जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी मंत्र्यांचा दावा फेटाळला आहे. पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे, असं तात्याराव लहाने आणि डॉ. रणजीत माणकेश्वर यांनी म्हटलं आहे.

 

- Advertisement -