घरमहाराष्ट्रनाशिकराज्यपालांना पहिन्याची ओढ; 'हे' आहे दौऱ्याचे कारण

राज्यपालांना पहिन्याची ओढ; ‘हे’ आहे दौऱ्याचे कारण

Subscribe

नाशिक : राज्यपाल रमेश बैस हे बुधवार (दि.२६) रोजी नाशिक दौर्‍यावर येत असून राज्यपाल त्र्यंबक तालुक्यातील पहिने गावी भेट देणार आहे. राज्यपाल पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर बैस यांचा हा पहिलाच नाशिक जिल्हा दौरा असणार आहे. या दौर्‍यात ते त्र्यंबक तालुक्यातील पहिने या गावी भेट देणार असून प्रशासकीय यंत्रणांकडून दौर्‍याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

प्रत्येक गावाचा विकास व्हावा व पक्के रस्ते बांधून गावखेडे, शहरांना जोडले जावे, या हेतूने शासनामार्फत प्रत्येक तालुक्यातील दुर्गम भागातील एक गाव दत्तक घेण्याचे काम सुरु आहे. याच माध्यमातुन नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत असलेले राज्यपाल रमेश बैस हे त्रंबकेश्वर तालुक्यातील पहिणे गावाला प्रत्यक्ष भेट देणार असून गावाच्या समस्या,विकास तेथील रोजगार ,साक्षरता या संदर्भात माहिती जाणून घेणार आहेत. या गावाला दत्तक घेउन त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यपाल बैस हे प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

पहिणे या गावात १ एप्रिल १९६० साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली, यात पहिणे, भिलमाळ आणि कोजुली असे तीन गावे असून तेथे १४ पाडे आहेत. देवगाच हे जिल्हा परिषद गटाचे नाव असून अंजनेरी हे पंचायत समिती गणाचे नाव आहे. २०११ सालच्या लोकसंख्ये नुसार या गावाची लोकसंख्या २९५४ येवेढी आहे. त्यात १४५४ महिला,१५०० पुरुष आहेत. यात ३०३ अनुसुचित जातीची लोक वास्तव्य करत असून २४१२ नागरीक हे अनु जमातीचे आहेत. या गावात जवळपास ८१ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची आहे. १७६६ हेक्टर क्षेत्र हे ग्रामपंचायतीचे भौगोलिक क्षेत्र आहे. येथे १८५ कुटुंबांकडे शिधा पत्रिका आहेत. या गावात प्रधानमंत्री आवास योजनेतुन ७३ घरे,शबरी आवास योजनेतुन १७ व रमाई आवास योजनेतुन १५ असे एकुण १०५ घरांचा लाभ ग्रामस्थांना मिळाला आहे.

भात,गहू,नागली,वरई ही मुख्य पिके आहेत. गावाचे लोकसंख्या साक्षरतेचे प्रमाण हे ५९ टक्के असून यात १००२ पुरुष व ७६४ महिला साक्षर आहेत. तर ४१ टक्के लोक हे निरक्षर आहेत. यात ४९८ पुरुष व ६९० महिला आहेत. पर्यटनाच्या द्रृष्टीने महत्वाचे असलेल्या या गावाचा विकास करण्यासाठी स्वता: राज्यपाल बैस यांनीच आता पुढाकार घेतला असून ते हे गाव दत्तक घेणार असल्याचे समजते आहे. त्रयंबकहून त्यांचे नाशिक शहरात आगमन होणार आहे. सर्वप्रथम कालिदास कलामंदिर येथे नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव सांगता समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तेथून सार्वजनिक वाचनालयाला ते भेट देतील. या भेटीनंतर पंचवटीमधील श्री काळाराम मंदिरात राज्यपाल दर्शन घेतील. दुपारी तीन नंतर राज्यपाल हॅलिकॉप्टरने शिर्डीकडे प्रयाण करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -