घरमहाराष्ट्रनीरा नदीने गाठली धोक्याची पातळी

नीरा नदीने गाठली धोक्याची पातळी

Subscribe

उजनीतून भीमा नदीत विसर्ग वाढविण्यात आल्याने भीमा नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

नीरा खोऱ्यातील अतिवृष्टीमुळे भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी धरणातून वीरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वीर मधून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आज सकाळी १ लाख क्यूसेक इतका करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. दरम्यान पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी चंद्रभागेतील स्नान आणि होड्या न चालविण्याचे आवाहन येथील भाविक आणि नाविकांना केले आहे.

ujani dam
उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग

निरेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता

पुढील काही दिवस आणखी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे त्यामुळे वीरमधील विसर्ग १ लाख १० हजार क्यूसेकपर्यंत वाढवला जाण्याचे संकेत नीरा उजवा कालवा विभागाने दिले आहेत. दरम्यान, भाटघर धरणाचे सर्व ४५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे निरेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वीर धरणातून आज पहाटे ६.३० वाजता नीरा नदीमध्ये ९४ हजार २५० क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यात वाढ करून हा विसर्ग सकाळी ८ वाजता १ लाख क्युसेक करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थिती कायम

लोकांना काळजी घेण्याचे आवाहन

नीरा नदीवरील पूल, नदी जवळील व सखल भागातील नागरी वसाहतींमधील लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. तसेच संबंधित शासकीय अधिकारी, यंत्रणा यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता निकम यांनी केले आहे.

प्रांताधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

दरम्यान, नीरा नदीला आलेल्या पाण्याबरोबर भीमा नदीत सोडले जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेता सुरक्षेसाठी भाविकांनी चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी जाऊ नये. पाण्याचा वेग जास्त असल्याने पाण्यात पोहण्यासाठी जाऊ नये. नदी पात्रात नाविकांनी होड्या चालवू नयेत, असे आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. दरम्यान भीमेत उजनीतून विसर्ग वाढविण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -