घरमहाराष्ट्रनाशिक"देवेंद्र फडणवीसांच्या जन्माआधीपासून निळवंडे धरणाचे काम सुरू", मुख्यमंत्र्यांची माहिती

“देवेंद्र फडणवीसांच्या जन्माआधीपासून निळवंडे धरणाचे काम सुरू”, मुख्यमंत्र्यांची माहिती

Subscribe

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज निळवंडे धरणाचे उद्घाटन करण्यात आले. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते विविध 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. निळवंडे धरणाचे काम हे देवेंद्र फडणवीस यांच्या जन्माआधीपासून सुरू झाले होते. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कामाला चालना दिली, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, निळवंडे धरणाचे काम हे त्यांच्या जन्माआधीपासून सुरू झाले होते. यामधल्या काळात काय झाले, त्या इतिहासात मी जाऊ इच्छित नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी धरणाच्या कामाला चालना दिली. आज निळवंडे धरणामुळे जवळपास 38 हजार हॅक्टर हजार जमीन आज ओलीताखाली येणार आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – सबका साथ, सबका विकास मोदींच्या प्रशासनाचा मंत्र; अजित पवारांची प्रतिक्रिया

महायुती सरकारला पंतप्रधानांकडून सर्वोतपरी मदत

यावेळी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “आमचे सरकार येण्यापूर्वी अडीच वर्षात सर्व प्रकल्प बंद होती. त्या सर्व प्रकल्पांना आमच्या सरकारने चालना दिली. नवीन प्रकल्प आम्ही सुरू केले म्हणून या राज्याचा सर्वांनी विकास करण्यासाठी आपल्याला डबल इंजन सरकारची आवश्यकता आहे. राज्याच्या विकासासाठी आपण ज्या ज्या गोष्टी पंतप्रधानांकडे मागितल्या ते त्यांनी देण्याचे काम केले.”

- Advertisement -

हेही वाचा – फित कापून खुशाल श्रेय घ्यावे, कारण…; निळवंडे धरणावरून राष्ट्रवादीचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

पोटात दुखणारांनी बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात जावे

ठाकरे गटावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, “गेल्या वर्षभरात आपण घेतलेले निर्णय सर्वांच्या समोर आहेत. समृद्धी महामार्ग, मेट्रो अनेक प्रकल्प आहेत. आपल्या सरकारने 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. पंतप्रधान मोदी ज्या कामाचे भूमी पूजन करतात. ते काम वेगाने पुढे जाते आणि ते पूर्ण होते, असा आपल्याला सर्वांचा अनुभव आहे. यामुळे आम्ही राज्यातील प्रकल्पाच्या भूमी पूजनाला, लोकार्पणला पंतप्रधानांना बोलवितो. पण काही लोकांच्या पोटात दुखते. त्यांच्याकडे आम्हाला बघायचे नाही. ज्यांची पोट दुखी आहेत. त्यांच्यासाठी आम्ही राज्यात बाळासाहेब ठाकरे दवाखाना आहे. आपल्या राज्यात 700 ठिकाणी विनामुल्य दवाखाना केला आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -