घरमहाराष्ट्रबीडमध्ये भरणार जगातील पहिले वहिले वृक्षसंमेलन

बीडमध्ये भरणार जगातील पहिले वहिले वृक्षसंमेलन

Subscribe

सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या आपल्या देशात आतापर्यंत अनेक संमेलने भरताना आपण पाहिली आहेत. त्यात साहित्य, नाट्य, शिक्षक व कर्मचारी यांच्या संमेलनाचे समावेश असतो. परंतु, आता बीडमध्ये वृक्ष संमेलन भरताना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हे वृक्ष संमेलन केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील पहिले वृक्ष संमेलन असणार आहे. या संमेलनासाठी सह्याद्री देवराईचे प्रणेते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

सयाजी शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी याच पालवनच्या उजाड माळरानावर हजारो वृक्षांची लागवड केली. ती रोपटी आता मोठे वृक्ष बनून डोलत आहेत. याच वृक्षांच्या पायथ्याशी राज्यातील हजारो वृक्षमित्र जमणार असून बीड शहराजवळच्या पालवन परिसरात देशातील पहिल्या वृक्ष संमेलनाची लगबग सुरू झाली आहे. या उजाड आणि उनाड माळावर असे एखादे नंदनवन होऊ शकते, अशी कल्पना लेखक अरविंद जगताप यांच्या डोक्यात आली आणि तिथून या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळू लागले.

- Advertisement -

या उजाड आणि ओसाड डोंगरावर तीन वर्षांपूर्वी केलेला हा प्रयोग आता यशस्वी होताना दिसत आहे. हा परिसर आता एक ग्रीन पार्क म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सकाळी मोकळी आणि ताजी हवा मिळावी, यासाठी बीडकर या सह्याद्री देवराईला पसंती देत आहेत. जानेवारीत होणार्‍या वृक्ष संमेलनाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती सयाजी शिंदे यांनी दिली.

लातूर-परभणीतही होणार प्रयोग
वन विभाग आणि बीडकरांच्या मदतीने उन्हाळ्यात या झाडांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आणि आता ही सह्याद्री देवराई नावारुपाला आली आहे. हिरवळीने नटलेला हा डोंगर पाहण्यासाठी गर्दी होत आहे. सातारा आणि बीडनंतर आता हा प्रयोग लातूर-परभणी जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे.

- Advertisement -

जगातले पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात पालवन येथील सह्याद्री देवराईत जानेवारी महिन्यात होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून बीडमध्ये झाड तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. साधारण लाखभर झाडं या संमेलनासाठी तयार करण्यात येणार आहेत. मुख्यतः देशी झाड लावण्यावर भर असेल. हे संमेलन खास करून विद्यार्थ्यांसाठी असेल. विद्यार्थ्यांना आपल्या देशी झाडांविषयी माहिती व्हावी, हा या संमेलनाचा मुख्य हेतू आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये झाडांविषयी आणि झाड लागवडीविषयी आवड निर्माण करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष संमेलन हे जगातील पहिले असेल, याची रूपरेषा आणि व्याप्ती मोठी असेल, जे वृक्ष कोणाला माहीत नाहीत ते या देवराईत असतील. यामुळे पर्यटन वाढण्यास मदत होईल आणि झाडांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचेल.-सयाजी शिंदे, अभिनेता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -