घरमहाराष्ट्रडायरीच नाही मग निविदा का काढली? आदेश बांदेकरांविरोधात मनसे आक्रमक

डायरीच नाही मग निविदा का काढली? आदेश बांदेकरांविरोधात मनसे आक्रमक

Subscribe

Adesh Bandekar | डायरी छापली नसली तरीही त्यासाठी निविदा काढण्यात आली होती, असा दावा चव्हाणांनी केला आहे. तसंच, आदेश बांदेकर विरपन्ना गँगचे सभासद असल्याचा उपहास टोलाही लगावला आहे.

मुंबई – प्रसिद्ध अभिनेते आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी सिद्धीविनायक मंदिर न्यासात (Siddhivinayak Temple Trust) घोटाळा केल्याचा आरोप मनसे सचिव मनोज चव्हाण (MNS Secretary Manoj Chavan) यांनी काल केला होता. आता यावर आणखी एक खुलासा चव्हाणांनी केला आहे. डायरी छापली नसली तरीही त्यासाठी निविदा काढण्यात आली होती, असा दावा चव्हाणांनी केला आहे. तसंच, आदेश बांदेकर विरपन्ना गँगचे सभासद असल्याचा उपहास टोलाही लगावला आहे.

हेही वाचा – सिद्धिविनायक मंदिरात आदेश बांदेकरांकडून घोटाळा? मनसेकडून गंभीर आरोप

- Advertisement -

आदेश बांदेकर यांनी मंदिरात केलेल्या भ्रष्टाचाराचा खुलासा करण्यासाठी मनोज चव्हाण यांनी ट्वीट केलं आहे. ‘आदेश बांदेकराचा खोटारडेपणा बघा, माध्यम प्रतिनिधींना माहिती सांगतायत की खर्च टाळण्यासाठी दैनंदिन डायरी छापली नाही मग निविदा का काढली? इतकी गडबड करून निविदा खुलीसुद्धा केली आणि हे काम स्नेहा प्रिन्ट्स सर्व्हिसला दिले. इतके होऊनसुद्धा फक्त उद्धव ठाकरे यांच्या फोटोसाठी या माणसाने डायरी प्रिंटींग थांबवून ठेवली आहे. या खोटारड्या माणसाला या पवित्र देवस्थानाच्या मंडळ अध्यक्ष पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. यावर बांदेकरांनी उलट प्रतिक्रिया द्यावीच मी याबाबतीत अजून कागदपत्रे जाहीर करतो. खोटारडे आदेश बांदेकर विरपन्ना गॅंगचा मेंबर, असं ट्वीट मनोज चव्हाण यांनी केलं आहे.


फक्त ट्वीट न करता मनोज चव्हाण यांनी निविदा काढल्याचे कागदपत्रच सार्वजनिक केले आहे. या कागदपत्रानुसार, ९ नोव्हेंबर रोजी ही निविदा काढण्यात आली असून इ-निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख १६ नोव्हेंबर रोजी ठरवण्यात आली होती. आता यावर आदेश बांदेकर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कोरोना काळामुळे ही डायरी छापली गेली नाही. आर्थिक खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी डायरी छापण्यात आली नाही. मनसेचे आरोप राजकीय हेतुने आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया आदेश बांदेकर यांनी काल दिली होती.

काही दिवसांपूर्वी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनीही आदेश बांदेकर यांच्यावर आरोप केले होते. सिद्धीविनायक ट्रस्टच्या नावाखाली बांदेकर यांनी पैसे खालल्याचा किल्लेदारांनी केला होता. शिवभोजन थाळी योजनेत आदेश बांदेकर यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -