घरमहाराष्ट्रमेहक प्रभू, उमेश कोल्हेंचा उल्लेख करत शेलारांचा ठाकरेंवर निशाणा; म्हणाले मुंबईकर हो....

मेहक प्रभू, उमेश कोल्हेंचा उल्लेख करत शेलारांचा ठाकरेंवर निशाणा; म्हणाले मुंबईकर हो….

Subscribe

Ashish Shelar | मेहक प्रभू आणि उमेश कोल्हेंच्या हल्लेखोरांना संरक्षण देणाऱ्यांच्या मनात मराठी माणसाविषयी हळहळ नाही असा आरोप आशीष शेलारांनी केला आहे.

मुंबई – श्रद्धा वालकर मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडीला धारेवर धरण्यात येत आहे. श्रद्धावर बेतलेल्या आपबितीसंदर्भात तिच्या प्रियकराविरोधात तिने पोलिसांत तक्रार दाखल करूनही तत्कालीन महाविकास आघाडी सरकराने दखल घेतली नाही. यावरून भाजपा नेते अॅड. आशीष शेलार यांनी शिवसेनेवर आगपाखड केली आहे. ज्यांच्या काळजात मराठीपणाची काळजीच उरली नाही, त्यांना मराठी म्हणावे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आझाद काश्मीरवाल्या मेहक प्रभूला जे क्लीनचीट देतात.. उमेश कोल्हेचा गळा चिरणाऱ्यांना संरक्षण देतात??? त्यांना श्रध्दा वालकरच्या निर्घृण हत्येची हळहळ वाटू नये..? काळजात ज्यांच्या “मराठीपणाची” काळजीच उरली नाही, मुंबईकर हो, आता तुम्ही सांगा यांना मराठी म्हणावे की नाही? असं आशीष शेलार यांनी ट्वीट केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – श्रद्धा वालकरच्या वडिलांचे वसई पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले असहकार्यामुळे…

मुंबईत आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या मेहक प्रभूला २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांनी क्लीनचिट दिली होती. तर, नुकत्याच घडलेल्या उमेश कोल्हे प्रकरणातही उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची दिशा भरकवटण्याचा प्रयत्न केला होता असा दावा नवनीत राणा यांनी विधानसभेत केला होता. उमेश कोल्हेप्रकरणातील आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल न करता जबरी चोरीच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी सीपी आरती सिंग यांना दिले होते. म्हणजेच, त्यांनी एका गुन्हेगाराला संरक्षण दिले होते असा दावा करत आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मेहक प्रभू आणि उमेश कोल्हेंच्या हल्लेखोरांना संरक्षण देणाऱ्यांच्या मनात मराठी माणसाविषयी हळहळ नाही असा आरोप आशीष शेलारांनी केला आहे.

- Advertisement -


श्रद्धा वालकरप्रकरणात श्रद्धाने तिच्याविरोधात होत असलेल्या अत्याचाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, म्हणूनच तिला जीव गमवावा लागला असा आरोप करण्यात येत आहे. श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेत वसई पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा दावा केला होता. त्यामुळे मराठी माणसाच्या तक्रारीची दखल न घेतल्याने यांना मराठी म्हणावे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – उमेश कोल्हे हत्या प्रकरण : उद्धव ठाकरेंच्या फोनची होणार चौकशी, शंभूराज देसाईंची घोषणा

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -