घरमहाराष्ट्रसिद्धिविनायक मंदिरात आदेश बांदेकरांकडून घोटाळा? मनसेकडून गंभीर आरोप

सिद्धिविनायक मंदिरात आदेश बांदेकरांकडून घोटाळा? मनसेकडून गंभीर आरोप

Subscribe

Adesh Bandekar | तसंच, या डायरीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो छापण्यात यावा अशी मागणी बांदेकर यांनी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीला काही विश्वस्तांनी विरोध केला, असा दावाही चव्हाण यांनी केला आहे.

मुंबई – निर्माते, अभिनेते आणि सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत. मनसेने (MNS) त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला असून बांदेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून (Siddhivinayak Temple Trust) दरवर्षी दैनंदिन डायरी छापली जाते. या डायरीत जमा-खर्चाची माहिती असते. मात्र, यावर्षी ही डायरी काढली नसल्याचा आरोप मनसे नेते मनोज चव्हाण यांनी केला आहे. यानिमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रात्री-अपरात्रीचा प्रवास टाळायला हवा, पण…; गोरे यांच्या अपघातानंतर शरद पवारांचं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनीही असेच आरोप केले होते. त्यानंतर, आता मनोज चव्हाण यांनीही हाच दावा केल्याने आदेश बांदेकर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तसंच, या डायरीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो छापण्यात यावा अशी मागणी बांदेकर यांनी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीला काही विश्वस्तांनी विरोध केला, असा दावाही चव्हाण यांनी केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कोरोना काळामुळे ही डायरी छापली गेली नाही. आर्थिक खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी डायरी छापण्यात आली नाही. मनसेचे आरोप राजकीय हेतुने आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया आदेश बांदेकर यांनी दिली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -