घर महाराष्ट्र "...आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही", मनोज जरांगे पाटलांच्या मुलीचा सरकारला इशारा

“…आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही”, मनोज जरांगे पाटलांच्या मुलीचा सरकारला इशारा

Subscribe

बुलढाणा : “मराठा पेठून उठलेलो आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही”, असा इशारा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची मुगली पल्लवी जरांगे पाटील हिने मराठा मोर्चातून राज्य सरकारला दिला आहे. पल्लवी जरांगे पाटील ही बुलढाण्याच्या मोर्चात सहभागी झाली. जालन्यातील अंतरावाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यात पोलिसांनी आंदोलनकर्ते आणि ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. यानंतर जालन्यातील लाठीमारच्या निषेधार्थ राज्यभरात मराठा समजाने आंदोलन करत राज्य सरकारला विरोध केला.

गेल्या 16 दिवसांपासून मनोज जारांगे पाटील उपोषण करत आहेत. जालन्यात आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाजाने शांतीपूर्ण मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात मनोज जारांगे पाटील यांची मुलगी पल्लवी जरांगे पाटील सहभागी झाली होती. या मोर्चात पल्लवीने भाषण केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Breaking : मनोज जरांगेंचे उपोषण सुटणार कधी? जालन्याला जाण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंची अनिश्चितता

पल्लवी जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही मराठा पेठून उठलेलो आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही. राज्य सरकारला देखील याची दखल घ्यावी लागेल आणि माझे वडील आरक्षण भेटल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. राज्य सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे, मला माझा बाप पण हवा आहे.”

- Advertisement -

 

- Advertisment -