घरमहाराष्ट्रमेट्रोच्या क्रेनखाली येऊन तिघींचा मृत्यू

मेट्रोच्या क्रेनखाली येऊन तिघींचा मृत्यू

Subscribe

नागपूर येथील अंबेझरी येथे मेट्रोचे काम सुरु असताना झालेल्या अपघातात तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. या मुली दुचाकीहून जात असताना हा अपघात झाला आहे. अंबेझरी परिसरातील टी पॉईंट जवळ हा अपघात झाला. अद्याप या मुलींची ओळख पटलेली नाही. घटनेनंतर तरुणींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषीत करण्यात आले. या मुलींचे मृतदेह रुग्णालयात असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेची नोंद करुन पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे. मेट्रो कामादरम्यान झालेला हा सर्वात मोठा अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूरमध्ये लवकरच मेट्रो धावणार आहे. यासाठी मागील काही महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. मात्र मेट्रो प्रकल्प सुरु होण्याअगोदरच झालेल्या या अपघातामुळे प्रकल्पाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. अपघातीची घटना कशी घडली? याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र या तिघींच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार?यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

- Advertisement -

कसा घडला अपघात

पहाटे या मुली दुचाकीवरुन जात होत्या. त्याच वेळी या परिसरात मेट्रोचे काम करणारी क्रेन फिरवण्याचे काम सुरु होते. क्रेन मागे वळत असताना तिथे मार्गदर्शन करण्यासाठी एक सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. मात्र सुरक्षा रक्षक नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. दिशा दाखवणारा रक्षक नसल्यामुळे क्रेनची दिशा चुकली आणि मुलींच्या दुचाकीची क्रेनला धडक लागली. क्रेनच्या मागच्या चाकाखाली येऊन दोघींचा जागीच मृत्यू झाला तर एकीचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -