घरमहाराष्ट्रचंद्रपूरात एका वाघिणीसह दोन बछड्यांचा विषबाधा होऊन मृत्यू

चंद्रपूरात एका वाघिणीसह दोन बछड्यांचा विषबाधा होऊन मृत्यू

Subscribe

चंद्रपूरात एका वाघिणीसह दोन बछड्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

चंद्रपूरात एका वाघिणीसह दोन बछड्यांचे मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर वनक्षेत्रात मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ हे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एक वाघीण आणि तिचे दोन बछडे असून ते आठ ते नऊ महिन्याचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

अशी झाली विषबाधा

चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर वनक्षेत्रात मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ काहीजण जांभळाच्या झाडावर गेले होते. जांभूळ काढण्यासाठी गेले असताना त्यांना त्या तलावाजवळ एका वाघिणीसह दोन बछड्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांनी याबाबत तात्काळ माहिती शंकरपूरच्या पर्यावरणवादी मंडळाच्या अमोद गौरकर या वन्यजीवप्रेमी तरुणाला दिली. अमोद गौरकर या वन्यजीवप्रेमींने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जवळच एक चितळ मृतावस्थेत आढळून आले. या चितळाचे दोन पाय तुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे या वाघिणीने आणि तिच्या बछड्याने त्या मृत चितळाला खाल्ल्याने त्यांना विषबाधा होऊन ते मृत झाले असावेत, असात अंदाज बांधला जात आहे. याप्रकरणी ब्रह्मपुरी वनविभागाचे डीएफओ कुलराज सिंग, चिमूरचे वनपरिक्षेत्र अदिकारी चिवंडे घटनास्थळी दाखल झाले आहेत.


हेही वाचा – सलग दुसऱ्या दिवशीही बिबट्याने घेतला गायीचा बळी, पिंजऱ्यात बछडा जेरबंद

- Advertisement -

हेही वाचा – उमरेडच्या जंगलात आढळला आणखी एका वाघिणीचा मृतदेह


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -