घरमहाराष्ट्रतलावाच्या गाळात अडकून वाघिणीचा मृत्यू

तलावाच्या गाळात अडकून वाघिणीचा मृत्यू

Subscribe

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या देवलापारच्या वनपरिक्षेत्रात आज, बुधवारी एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला. वन अधिकाऱ्यांकडून या वाघिणीचे शवविच्छेदन करण्यात आले.

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या देवलापारच्या वनपरिक्षेत्रात आज, बुधवारी एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला. परिसरातील ब्रांदा तलावाच्या गाळात अडकून या वघिणीचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार देवलापार वनपरिक्षेत्रातील बांद्रा तलाव येथे नियमित गस्त करत असताना वनरक्षकांना एक वाघ गाळात अडकून मृत झाल्याचे आढळून आले.

वाघिणीचे शवविच्छेदन केले

गस्ती पथकाने या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर,उपसंचालक अमलेंदू पाठक, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी अनिल दशहरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध नंदागवळी, डॉ. चेतन पातोंड, डॉ. विनोद समर्थ, सहायक वन संरक्षक (अतिरिक्त कार्यभार) अतुल देवकर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृत वाघिणीच्या अवती-भवती काहीही अवैध आढळून आले नाही. सदर वाघिणीचे पाय आणि तोंडाचा भाग गाळात फसल्याचे आढळून आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या कार्यपद्धतीनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले. प्राथमिक परिस्थितीजन्य पुराव्यानुसार वाघिणीचा मृत्यू दलदलीत अडकल्याने आणि श्वासनावरोधाने झाला असल्याचे दिसून आले. सादर वाघिण ही घटनास्थळाकडे येत असतानाच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या आहे. उपस्थित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता वाघिणीचे नखे, सुळे आणि इतर सर्व अवयव मूळ जागेवर आढळून आले. शवविच्छेदनानंतर अधिकाऱ्यांच्या समक्ष वाघिणीचे दहन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -