घरठाणेTMC Traffic Congestion: ठामपा तिजोरीत वाढ; ढोकाळी - कोलशेत परिसरात वाहतूक कोंडी

TMC Traffic Congestion: ठामपा तिजोरीत वाढ; ढोकाळी – कोलशेत परिसरात वाहतूक कोंडी

Subscribe

ठाणे : ठाण्यातील सर्वात मोठे  ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क ’ दोन महिन्यापूर्वीच सुरु करण्यात आले. या ठिकाणी राज्यभरातून नागरिक या पार्कला भेट देण्याकरिता येत आहेत. आता शाळेला सुट्ट्या देखील सुरु झाल्या आहेत. यामुळे सेंट्रल पार्क करीता नागरिकांचा ओढ वाढत असल्याने ढोकाळी, कोलशेत परिसरात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रहिवाशांना यांचा मोठा फटका बसत आहे. या पार्कमुळे आता पर्यंत पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला आहे.

ठाण्यातील ढोकाळी – कोलशेत येथील २०.५ एकर जागेवर ‘ नमो द ग्रँड सेंट्रल पार्क ‘ मागील दोन महिण्यापूर्वी उभारण्यात आले, याचे उदघाटन ९ फेब्रुवारी रोजी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ठाण्यातील सर्वात मोठे हे पार्क असल्याने पार्कमध्ये लहान मुले याना खेळण्याकरिता तसेच नागरिकाना फेर फटका मारण्याकरिता तसेच युवक, युवतींना सेल्फी काढण्याकरिता अनेक पॉईंट या परिसरात आहेत. तसेच शांतता मिळण्याकरिता देखील या पार्कला नागरिक भेट देत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा-वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये एसी नीट काम करीत नसल्याने रेल्वे प्रवाशांचा संताप

या पार्कला जाण्याकरिता कापूरबावडी वरून ढोकाळी नाका मार्गे कोलशेतला नागरिक वाहनांनी जात आहेत. यामुळे ढोकाळी नाका येथे दररोज सकाळ, संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीतुन निघताना २० ते २५ मिनिटे अडचणींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे कापूरबावडी ते कोलशेत रोड हा रस्ता काही कारणात्सव वाहतूक विभागाच्या वतीने बंद करण्यात आला होता. तो आज बुधवारी पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. पण तरीही ह्या विभागात वाहतूक कोंडी होणार असून वाहतूक कोंडीवर योग्य तो उपाय वाहतूक पोलिसांनी करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

या नमो द ग्रँड सेंट्रल पार्कला सुमारे दोन महिन्यात सुमारे ४ लाख  नागरिकांनी भेट दिली, या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला.  कोलशेत येथे महापालिकेला विकास प्रकल्पांतर्गत २०.५ एकरचा सुविधा भूखंड उपलब्ध झाला होता. त्यावर महापालिकेने कल्पतरू विकासकाकडून ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ हे उद्यान विकसित करून घेतले. उद्यानात पक्षी आणि फुलपाखरांच्या १०० पेक्षा जास्ती जातींचा अधिवास, ३ हजार ५०० पेक्षा जास्त झाडे, न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हायड पार्क आणि शिकागोच्या लिंकन पार्क, मोरोक्कन, चिनी, जपानी आणि मुघल रचनांनी प्रेरित संकल्पना उद्याने

खेळण्याकरिता जागा, जॉगींग ट्रॅक, स्केटींग पार्क या गोष्टी तसेच अत्याधुनिक सुविधा या पार्कमध्ये आहेत. यामुळे राज्यभरातून हे सेंट्रल पार्क पाहण्याकरिता नागरिक येत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नात मोठी भर झाली आहे. पन या सेंट्रल पार्क मुळे होणारी वाहतूक कोंडीवर देखील उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे ढोकाळी, कोलशेत येथील स्थानिक नागरिक सांगत आहेत.

हेही वाचा-Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील पंतप्रधान मोदींच्या सभांना प्रतिसाद नाही – संजय राऊत

 


 

Edited by- Amol kadam

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -