घरताज्या घडामोडीलसीचे दोन डोस घेतलेल्यांना मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेश,शासनाच्या निर्णयाचा दुकान मालकांकडून विरोध

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेश,शासनाच्या निर्णयाचा दुकान मालकांकडून विरोध

Subscribe

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्याची सरकारची अट तातडीने मागी घ्यावी अशी मागणी सातत्याने दुकान मालकांकडून करण्यात येत आहे.

कोरोना निर्बंधात शिथिलता आणत राज्यात अनेक ठिकाणी रविवार पासून शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील हॉटेल्स आणि मॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे मॉल आणि हॉटेलमध्ये लसीचे दोन डोस घेतल्याना प्रवेश देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे हॉलेट,मॉलमध्ये काम करणारे कर्मचारी, दुकानमालक त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणे गरजेचे आहे तरच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाचा दुकान मालकांकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. इतर सामान्य दुकानांना जे नियम आहेत तेच नियम हॉटेल आणि मॉलसाठी असावेत असे त्यांचे म्हणणे आहे.

कोरोना काळात गेल्या दीड वर्षांपासून दुकान व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे असले नियम लादून आमच्यावर अन्याय केल्यासारखे आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्याची सरकारची अट तातडीने मागी घ्यावी अशी मागणी सातत्याने दुकान मालकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल पास

कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे अशा नागरिकांच्या पासची व्यवस्था देखील करण्यात आली असू त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना खास क्यूआर कोड असलेला युनिव्हर्सल पास देण्यात येणार आहे. हा युनिव्हर्सल पास मेट्रो, मोनो ट्रेन, मॉल सारख्या ठिकाणी देखील वापरता येणार आहे.

महाराष्ट्र अनलॉकमध्ये राज्यातील सिनेमागृ, नाट्यगहे सुरू करण्यावर अद्याप बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शासकिय कार्यालये २४ तास सुरू ठेवण्यासही परवानगी देण्यात आलीय. लसींचे दोन डोस घेतलेल्या कार्यालयात शंभर ट्क्के क्षमतेने कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात शाळा सुरु होणार नाहीत, टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -