आर बल्की यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, सनी देओल आणि पुजा भट्ट दिसणार प्रमुख भुमिकेत

सुप्रसिध्द दिग्दर्शक आर बल्की यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात प्रमुख भुमिकेत प्रसिध्द अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री पूजा भट्ट दिसणार आहेत. त्याच बरोबर श्रेया धन्वंतरी, दुलकर सलमान हे कलाकार असणार आहेत.

आर बल्की यांनी हिंदी सिनेसृष्टीला अनेक प्रसिध्द चित्रपट दिले आहेत. पा, इंग्लिश विंग्लिश, शमिताभ, पॅडमॅन, मिशन मंगल, असे एका पेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले.

आर बल्की यांचा नवा चित्रपट २०२२ च्या सुरुवातीला रिलिज होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच नाव आद्याप ठरलेल नाही. पण चित्रपट थ्रिलर असल्याची महिती समोर आली आहे. २४ वर्षानंतर सनी देओल आणि पूजा भट्ट पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

थ्रिलर म्हणजेच थरारक, अशा प्रकारचा चित्रपटाच दिग्ददर्शन पहिल्यांदाच करणार असल्यामुळे ते स्वत: खूप उत्साहित आहेत. सिनेमाचे नाव अजूनही ठरलेले नाही. पण लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट थ्रिलर असल्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुकतेत आहेत.