घरमहाराष्ट्रयवा, चिंदर गावच्या 'गावपळणीक' यवा!!

यवा, चिंदर गावच्या ‘गावपळणीक’ यवा!!

Subscribe

मालवण तालुक्यातील चिंदर गावात १ डिसेंबर रोजी 'गावपळण' होणार आहे. यावेळी सर्व गावकरी तीन दिवस गावाबाहेर राहणार आहेत.

अनेक परंपरासाठी कोकण ओळखला जातो. मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी माणूस स्थायिक झाला असला तरी त्याची गावची ओढ काही कमी झालेली नाही. आजही कोकण आणि कोकणवासियं आपल्या परंपरा जपत आहेत. शिवाय स्थानिक लोक देखील त्यामध्ये हिरारीनं भाग घेताना  दिसत आहेत. कोकणची अनोखी परंपरा असलेली ‘गावपळण’ ही मालवण तालुक्यातील चिंदर गावात १ डिसेंबर रोजी होत आहे. मालवण तालुक्यातील चिंदर गावात ग्रामदेवतेचा कौल घेऊन आजही ही परंपरा मोठ्या उत्साहात दर तीन वर्षांनी जोपासली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये बसून गावपळणीचा कौल घेतला जातो. चिंदर गावची गावपळण ग्रामदेवतेनं परवानगी न दिल्यानं  २०१० सालानंतर गेली आठ वर्ष झाली नव्हती. शुक्रवारी प्रथेप्रमाणे ग्रामदेवता देव रवळनाथाचा कौल घेऊन प्रथेप्रमाणे बारा पाच मानकरी जमले. त्यानंतर १ डिसेंबर ही गावपळण तारीख निश्चित करण्यात आली. चिंदर गावची वस्ती ही ५ हजार आहे. १ डिसेंबरला मंदिराकडे ग्रामस्थ व मानकरी जमल्यानंतर पुर्वांपार चालू रूढीप्रमाणे ढोल वाजवत गाव फुटल्याचा इशारा दिल्यानंतर गावपळणीला सुरूवात केली जाते. त्यानंतर सर्व ग्रामस्थ पाळीव प्राणांसह तीन दिवस वेशीबाहेर जाणार आहेत. चौथ्या दिवशी पुन्हा सर्व मानकरी जमून देवाचा कौल घेऊन कौल प्रसाद ( ग्राम देवतीची परवानगी ) झाल्यावर पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -