घरठाणेदहिसर टोलनाक्यावर फास्ट टॅगची पारंपरिक यंत्रणा; पिवळी पट्टी हटवली, नियमांना हरताळ

दहिसर टोलनाक्यावर फास्ट टॅगची पारंपरिक यंत्रणा; पिवळी पट्टी हटवली, नियमांना हरताळ

Subscribe
भाईंदर – वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्ट टॅग ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यावर मात्र या फास्ट टॅग यंत्रणेलाच हरताळ फासल्याचं स्पष्ट झालं आहे. फास्ट टॅग स्कॅनर काठीला बांधून वाहनांवर हाताने फास्ट टॅग केलं जात असल्याने वाहतूक कोंडी पुन्हा वाढू लागली आहे. याविरोधात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्याकडून कुठलीच ठोस कारवाई केली जात नसल्याने प्रवाशांनी संपात व्यक्त केला आहे. त्यासोबतच टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मारलेली पिवळी पट्टीही गायब झालेली आहे.
काही दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला होता. त्याचवेळी त्यांच्यासमोरच आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदरच्या जनतेला डोकेदुखी ठरत असलेल्या दहिसर टोलनाका हटविण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी लवकरच संवाद साधून तो टोलनाका शहराच्या बाहेर मोकळ्या ठिकाणी हलविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही दिलेले आश्वासन पाळण्यात आलेले नाही.
आमदार जैन यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांच्या समोरच दहिसर टोल नाक्याचे दुःख मांडले होते. तर जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधीला मंत्रालयात बैठकीत जाण्यासाठी दहिसर चेक नाका येथील टोल नाक्याच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नेहमीच तीन तास लागतात. यामुळे वाहतूक कोंडी, पेट्रोल डिझेल व सोबत वेळही वाया जातो व त्याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होत असतो. दुसरीकडे केंद्रीय मंत्र्यांनी वेळ व इंधन दोन्हीची बचत व्हावी याकरिता उपाययोजना करत असताना त्यात बोगदे, उड्डाणपूल व लिंक रोड अशा विविध उपाययोजना आखत असताना त्यांच्याच खात्याच्या अंतर्गत असलेल्या दुसरीकडे दहिसर टोल नाक्यावरील पिवळी पट्टीच गायब झाली आहे. पिवळ्या पट्टीवर वाहतुकीची रांग येताच वाहनांना विनाटोल घेता सोडायचे व वाहतूक कोंडी कमी करायची असते. पण चेकनाका ते काशिमिरा व चेकनाका ते बोरिवलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्या तरीही एमसारडीसी व पोलीस विभाग त्यावर कारवाई करत.
पालघर, ठाणे, वसई विरार व मीरा भाईंदर या भागातून अतिदक्ष व गंभीर रुग्ण मुंबई शहरातील रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकानांही वाहतूक कोंडी फुटण्याची वाट बघावी लागते. त्यातच बहुतांश वेळा रुग्ण दगावण्याची दाट शक्यता असते. त्यातच फास्ट टॅग चालत नाहीत, म्हणून वाहतूक कोंडी झाली तरी चालेल पण काठीला मशीन बांधून हातानेच फास्ट टॅग करून टोल वसुली सुरू आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -