घरपालघरवेळप्रसंगी या दडपशाहीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू

वेळप्रसंगी या दडपशाहीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू

Subscribe

या निवडणुकीकरता शिवसेनेच्या सदस्यांवर दबाव आणला जात आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. आमिषे दाखवली जात आहेत,

वसई : पालघर जिल्हा परिषदेची लढाई ही दडपशाहीविरुद्ध लोकशाहीची असेल. ज्यांना कुणाला धमक्या, बळजबरी किंवा गुन्हे दाखल करायचे ते करू द्या. वेळप्रसंगी या दडपशाहीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते आणि प्रवक्ते भास्कर जाधव यांनी दिला. वसई शिवसेनेच्यावतीने नालासोपारा पूर्व-तुळींज शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पालघर जिल्हा परिषदेच्या १६ नोव्हेंबर रोजी असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या दडपशाहीवर त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. या निवडणुकीकरता शिवसेनेच्या सदस्यांवर दबाव आणला जात आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. आमिषे दाखवली जात आहेत, अशी माहिती मला मिळाली असल्याची माहिती जाधव यांनी यांना यावेळी दिली. शिवसेनेच्या काही महिला सदस्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे.

शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांच्या हॉटेलवर गुटखा टाकून हॉटेल बंद पडण्याची धमकी देण्यात आली आहे. काहींच्या पेट्रोलपंपवर महसूल अधिकार्‍यांना पाठवून पंप सील करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यातील महिला गरोदर आहेत. त्यांच्या जीवाचे काही बरे-वाईट न घडो. मला मिळालेली माहिती खोटी ठरो, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आताचे सरकार हे शिवसैनिकांवर पक्ष प्रवेशासाठी पालघरमध्ये दडपशाही करत आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्यांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे ही लढाई दडपशाहीविरुद्ध लोकशाहीची आहे. वेळप्रसंगी या दडपशाहीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू. त्याचे नेतृत्व मी करणार आहे, असे थेट आव्हानच भास्कर जाधव यांनी गटाला दिले आहे. पालघर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख पंकज देशमुख,माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण,तालुकाप्रमुख स्वप्नील बांदेकर,जनार्दन पाटील आदी नेते पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

- Advertisement -

भाजपने शिवसेना फोडण्याचे काम केले असून फुटलेल्यांमधील नाराजी बरोबरच या आमदारांबद्दल भाजपमध्येही नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यावर हसत त्यांनी मला दम दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मी बोलणार नाही, असे उत्तर जाधव यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि शिवसेनेतील भाजपमधील लोक वेगवेगळ्या कारणांनी दबावाखाली आहेत. त्यामुळे ते टीका करत आहेत. ज्यांच्यावर आरोप आहेत असे नेते भाजपमध्ये जाऊन शुध्द होत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. विरार,नालासोपारा आणि वसई परिसरात माझ्या गुहागर मतदारसंघातील अनेक रहिवाशी राहतात. सातत्याने ते मला वसई-विरार शहरात येण्यासाठी आग्रह करत होते. आजचा हा मेळावा त्यांच्यासाठीच होता. त्यांच्या आग्रहाखातरच मी आज याठिकाणी आलो. पण जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या एका निर्णयाने मला त्यांच्यात राजकीय प्रगल्भता दिसली, असेही जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -