घरमहाराष्ट्रमहामार्ग झाले संथ, चाकरमान्यांना खंत !

महामार्ग झाले संथ, चाकरमान्यांना खंत !

Subscribe

लाडक्या बाप्पांना निरोप देऊन गावांकडून शहरांकडे निघालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवासही खडतरच होत आहे. पावसासह खड्ड्यांच्या जाळ्यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह वाकण-खोपाली महामार्गही संथ झाल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून गावी राहिलेले चाकरमानी गौरी-गणपती विसर्जनानंतर लगेचच परतीच्या प्रवासाला लागलेले असल्यामुळे शनिवारी दुपारपासूनच काहीसे शांत झालेले हे मार्ग कार, जीप, टेम्पो, तसेच एसटी व खासगी बसेसने फुलून गेले आहेत. गोवा महामार्गाच्या बाजूने धावणारी कोकण रेल्वेही हाऊसफुल झाली आहे. एसटीचाही आधार न मिळालेले चाकरमानी खासगी वाहने पकडून मुंबई, ठाणे, तसेच गुजरात बाजूकडे निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. कशेडी घाटाला पर्याय नसल्याने वाहनांचा भोगावपर्यंतचा प्रवास कूर्मगतीने सुरू होता.

- Advertisement -

तिकडे मुंबई-गोवा महामार्गाला उत्तम पर्याय म्हणून अलिकडे बोलबाला झालेल्या वाकण-पाली-खोपाली मार्गावरही वाहतूक कमालीच्या संथगतीने सुरू राहिल्याने प्रवासी चांगलेच त्रस्त झाले होते. जांभूळपाडा-परळी दरम्यान तीन ते चार किलोमीटरच्या अंतरात वारंवार वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागत होत्या. त्यातच बुजविलेल्या खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याने व धुवांधार पाऊस यामुळे वाहने ेचालविणे चालकांसाठी आव्हान ठरत आहे. माणगावहून पाटणूस मार्गेही वाहने मोठ्या प्रमाणात आल्याने पाली शहरात वाहतूक कोंडीचे विघ्न वारंवार निर्माण होत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -