घरअर्थजगतहायब्रीड कार, बीएस-६ इंजिन वाहनांना जीएसटीमध्ये सवलत मिळावी -नितीन गडकरी

हायब्रीड कार, बीएस-६ इंजिन वाहनांना जीएसटीमध्ये सवलत मिळावी -नितीन गडकरी

Subscribe

हायब्रीड कार आणि बीएस-६ इंजिन असलेल्या वाहनांना वस्तू व सेवा करात (जीएसटी) सवलत देण्याच्या वाहन उद्योगाच्या मागणीला केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी समर्थन दिले आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आपण हा मुद्दा उपस्थित करू, असे त्यांनी म्हटले आहे.

वाहन उत्पादक उद्योगाची संघटना ‘सियाम’च्या वार्षिक परिषदेत गडकरी यांनी म्हटले की, पेट्रोल व डिझेलच्या वाहनांना कर सवलत मिळायला हवी, अशी मागणी वाहन उद्योगाने केली आहे. तुमची मागणी चांगली आहे. मी तुमचा संदेश वित्तमंत्र्यांकडे घेऊन जाईन. करात तात्पुरती कपातही फायदेशीर ठरू शकते. याचा मी वित्तमंत्र्यांकडे पाठपुरावा करीन. वाहन विक्री वाढण्यासाठी या क्षेत्राला याक्षणी मदतीची गरज आहे.

- Advertisement -

वाहनांची विक्री सध्या विक्रमी पातळीवर घसरली आहे. त्यामुळे वाहन उद्योगाकडून कर सवलतीची मागणी केली जात आहे. सध्या कारवर २८ टक्के जीएसटी आहे. छोट्या कारवर १ टक्का कमी जीएसटी लागतो. एसयूएव्हींवर १५ टक्के अतिरिक्त उपकरासह एकूण ४३ टक्केे कर लागतो. गडकरी यांनी सांगितले की, वाहन उद्योगाने अंतर्गत वित्त शाखा सुरू कराव्यात. त्यातून विक्री वाढण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -