घरताज्या घडामोडीजखमी रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा, नायर रुग्णालयातील २ डॉक्टरांसह नर्स निलंबित

जखमी रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा, नायर रुग्णालयातील २ डॉक्टरांसह नर्स निलंबित

Subscribe

वरळी, बीडीडी चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात जखमी झालेल्या चौघांवर उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पालिका आरोग्य खात्याने नायर रुग्णालयातील २ डॉक्टर व एका नर्सवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेप्रकरणी उप अधिष्ठाता यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यावर त्यात जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी ‘थर्ड पार्टी’ चौकशीही करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

वरळी येथील बीडीडी चाळीत मंगळवारी झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात आनंद पुरी (२७), मंगेश पुरी (४ महिने), विद्या पुरी (२५) आणि विष्णू पुरी (५) हे चौघेजण जखमी झाले होते. त्यापैकी आनंद पुरी व मंगेश पुरी हे गंभीर जखमी होते. मात्र त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असताना त्यावेळी उपस्थित डॉक्टर, नर्स आदींनी त्यांना तात्काळ उपचार देण्यात अक्षम्य हलगर्जीपणा केला, असा आरोप करण्यात आला असून त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्याची गंभीर दखल घेऊन भाजपने सदर घटनेप्रकरणी चौकशी करून कडक कारवाईची मागणी केली होती.

- Advertisement -

तर, नायर रूग्णालय प्रशासनाने सदर घटनेच्या चौकशीसाठी उपअधिष्ठाता यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राथमिक चौकशीनुसार नायर रुग्णालयातील २ डॉक्टर व एका नर्सवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणी चौकशी सुरु असून सखोल चौकशी अहवाल आल्यावर दोषींवर कठोर कारवाई कण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे, नायर रुग्णालयातील समितीचा चौकशी अहवाल योग्य की अयोग्य हे तपासण्यासाठी थर्ड पार्टी चौकशी केली जाईल. त्यासाठी पालिका आरोग्य खात्याचे एक डॉक्टर आणि बाहेरील दोन डॉक्टर हे फेर चौकशी अहवाल तयार करतील, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.

- Advertisement -

या घटनाप्रकाराची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. यापुढे पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना इमर्जन्सी तसेच इतर ठिकाणी रुग्ण आणि नातेवाईकांबरोबर कसे वागावे, कसे बोलावे याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेषतः रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशी सुसंवाद साधणे, माणुसकी ठेवून वागणे आणि संवेदना जागृत ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले.


हेही वाचा : Corona: कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी, बारावीचे परीक्षा शुल्क माफ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -