घरक्राइमबॅनर फाडण्यावरून दोन गट भिडले आपापसात; पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच नागरिकांचा...

बॅनर फाडण्यावरून दोन गट भिडले आपापसात; पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच नागरिकांचा सुटकेचा निःश्वास

Subscribe

नाशिक : साहेब, आमच्या भागात लावलेल्या महापुरुषाचे बँनर फाडले आहेत, असा कॉल पोलीस ठाण्यात आला. या कॉलचे आणि घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता बॅनर फाडण्याच्या कारणावरून दोन गट आपापसात भिडल्याचे दिसले. या दोन गटातील वाद कमी होण्याची चिन्ह दिसत नव्हते. अखेर दंगाकाबू पथकाला पाचारण करण्यात आले आणि या दंगाकाबू पथकाच्या जवानांनी दंगा नियंत्रणात आणला आणि दंगेखोरांसह दंगा करण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या समाजकंटकांना अटक केली. तेव्हाच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने पाथर्डी फाटा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दंगाकाबू पथकाच्या वतीने मॉक ड्रिल करण्यात आले. कोणत्या कारणावरून दंगल झाली, एवढे पोलीस कशासाठी आले, असे प्रश्न अनेकांकडून विचारणा होत होती. यावेळी बघ्यांची गर्दी केली होती. मॉक ड्रिलमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, आर. बी. पाचोरकर यांच्यासह १४ अधिकारी, ५७ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. शिवाय, मॉक ड्रिलमध्ये १४ मोठे पोलीस वाहने आणि ४ दुचाकी होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -