घरमहाराष्ट्रपुण्यात झोपडपट्टीत भीषण आग, दोघांचा मृत्यू

पुण्यात झोपडपट्टीत भीषण आग, दोघांचा मृत्यू

Subscribe

पुण्यातील चिंचवडमध्ये झोपडट्टीत बुधवारी रात्री भीषण आग लागली असून या आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुण्यातील चिंचवडमध्ये झोपडट्टीत बुधवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

नेमके काय घडले?

चिंचवड येथील दळवीनगर झोपडपट्टीत बुधवारी रात्री अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. अचानक जोराचा आवाज आल्याने सर्व नागरिक बाहेर पडले. त्यादरम्यान सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्यानं आगीने पेट घेतला. या आगीत पाच झोपड्या जळून खाक झाल्या असून या आगीमध्ये प्रदीप मोटे आणि शंकर क्षीरसागर या दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

- Advertisement -

वाचा – कलिना येथील गुजराल हाऊसला भीषण आग

- Advertisement -

वाचा – ठाण्यात रिक्षाला भीषण आग; सुदैवाने जिवीतहानी टळली

वाचा – डोंबिवलीत झेनिथ कंपनीला भीषण आग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -