घरताज्या घडामोडीIrshalwadi Landslide : शोधकार्य थांबवलं, अजूनही 57 जण बेपत्ता; उदय सामंत यांची माहिती

Irshalwadi Landslide : शोधकार्य थांबवलं, अजूनही 57 जण बेपत्ता; उदय सामंत यांची माहिती

Subscribe

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडीत दरड कोसळून 29 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री 11.00 वाजताच्या सुमारास घडली. रात्री कोसळणाऱ्या पावसामध्ये ही भीषण दुर्घटना घडल्याने वाडीतील 17 घरं जमीनदोस्त झाली आहेत. मागील चार तीन दिवसांपासून 27 जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात NDRFच्या पथकाला यश आलं आहे. सततच्या पावसामुळे बचावकार्यला काम करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु इर्शाळवाडीत स्थानिक प्रशासनाकडून कलम 144 लागू करण्यात आले असून हे कलम पुढील 15 दिवसांसाठी लागू करण्यात आले आहे. परंतु आजपासून हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

खालापूर पोलीस ठाण्यात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी माहिती दिली. इर्शाळवाडीत आतापर्यंत 27 मृतदेह सापडले आहेत. परंतु हे 57 जण बेपत्ता होते. त्यांना मृत घोषित करून आजपासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. दरम्यान, बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असं उदय सामंत म्हणाले.

- Advertisement -

या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेच घटनास्थळी दाखल झाले आणि पहाटे 4 वाजल्यापासूनच सर्व यंत्रणा आणि स्थानिक कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावले. एकूण 228 लोकसंख्या होती. त्यामध्ये 57 लोकसंख्या ही बेपत्ता आहे. 27 जणांचे मृतदेह मिळालेले आहेत. 144 जणांना सुरक्षितस्थळी ठेवण्यात आलं आहे. त्यांना सर्व प्रकारच्या सोयिसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 43 कुटुंबांपैकी 2 कुटुंब पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. तर 41 कुटुंबातील144 लोकं हे आज त्या मंदिरात आहेत. त्यांची पुनर्वसनाची योजना दोन टप्प्यांत प्रशासनाने केली आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदेंनी सिडकोशी चर्चा करून घर बांधून देण्याबाबत सिडकोने निर्णय घेतला आहे. जी कुटुंब ताप्तुरते तिथे राहत आहेत. त्यांना आपण कंटेनरमध्ये ठेवणार आहोत. त्यांना लागणाऱ्या गृहउपयोगी व्यवस्था देखील करण्यात आल्या आहेत, असंही उदय सामंत म्हणाले.

मदतकार्यात नेमलेल्या व्यक्ती, संस्थां व्यतिरिक्त इतर कोणालाही आता गडावर जाता येणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासाठी चौक मानवली गावाच्या हद्दीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावात प्रवेश करणाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच, 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश देखील लागू करण्यात आले आहेत. कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी शनिवारी हे विशेष आदेश लागू केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : इर्शाळवाडीत प्रशासनाकडून कलम 144 लागू, उपविभागीय अधिकाऱ्यांचा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -