घरमहाराष्ट्रअशा घुशी आम्ही खूप बघितल्या; उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांना टोला

अशा घुशी आम्ही खूप बघितल्या; उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांना टोला

Subscribe

जळगावः सभेत घुसू म्हणाले होते. अशा घुशी आम्ही खूप बघितल्या आहेत. अशा घुशींना निवडणुकीत हाणूनच पाडू, असा टोला उद्धव ठाकरे यांनी आमदार गुलाबराव पाटील यांना जळगाव येथील सभेत लगावला.

महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा जळगाव येथील पाचोरा येथे आयोजित करण्यात आली. या सभेवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. आमदार गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसण्याचे वक्तव्य केले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी सभेत गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला.

- Advertisement -

मी वाट बघत होतो की सभेत घुसणाऱ्या घुशी कधी येतील. पण सभा संपेर्यंत घुशी काही आल्या नाहीत. अशा गद्दारांना निवडणुकीत हाणून पाडायचं आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

मेहनत तुम्ही करता आणि टिकोजीराव वर बसतात. आता पुन्हा त्यांना खाली खेचण्याची वेळ आली आहे. निवडून आलेले गद्दार झालेत पण निवडून देणारे आजही माझ्या सोबतच. अंबादास दानवे यांनी भाषणात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. होय मी घरी बसून सरकार चालवले. पण तुम्ही फिरुन काय करत आहात. महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कोरोनाचे जागतिक संकट होतं. नैसर्गिक संकटात असताना आपण शेतकऱ्यांना मदत केली. मात्र आता सरकारच अवकाळी आहे. यांनी एकाही संकटात मदत केली नाही.  मग हे बोलावेच लागणार, असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला.

- Advertisement -

जळगावातील कवी शेतकऱ्याची भेट घेतली. त्या शेतकऱ्याने सद्याच्या स्थितीवर भाष्य करणारी कविता केली आहे. मुद्दामच त्याचा स्टेजवर आणलं नाही. नाही तर त्याच्याविरोधात सरकारने कारवाई केली असती. बहिणाबाई जर आज असत्या तर त्यांना पण या सरकारने तुरूंगात टाकलं असतं. आईच्या कुशीवर वार करणारी गद्दारांची अवलाद आपली नाही. काही लोक बाप बदलतात आणि बाप चोरतात. तुमच्या मेहनतीचे रक्त पिणारे हे गद्दार आहेत, त्यांना मारायला तोफ नको. आज माझ्याकडे काही नाही पण आशीर्वाद देणारे तुमचे हात माझ्या सोबत आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -