घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : संकटाच्या काळातही जोशी सर बाळासाहेबांसोबतच - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : संकटाच्या काळातही जोशी सर बाळासाहेबांसोबतच – उद्धव ठाकरे

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनोहर जोशी हे बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक होते, असे त्यांनी श्रद्धांजली देताना म्हटले आहे.

बुलढाणा : संकटाच्या काळातही मनोहर जोशी हे कायमच बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले, त्यामुळे माजी मुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते यापेक्षाही ते बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक होते, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उद्धव ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या बुलढाणा येथे आहेत. परंतु, आता ते पक्षाच्या नेत्यांसह मुंबईला येण्याकरिता निघाले असून ते दुपारी मनोहर जोशी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार आहेत. (Uddhav Thackeray paid tribute to Manohar Joshi, calling him a true Shiv Sainik of Balasaheb)

हेही वाचा… Manohar Joshi : अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता, फडणवीस यांच्या शोकसंवेदना

- Advertisement -

बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, ते लोकसभेचे अध्यक्ष होते. ते केंद्रीय मंत्री होते. पण त्याहीपेक्षा ते सच्चा शिवसैनिक होते. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येत असतात. संकटाच्याकाळातही ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले. शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले. एवढेच नव्हे तर ज्यावेळी बाळासाहेब यांना बेळगाव-कारवार सीमा आंदोनलनाच्या वेळी अटक झाली होती, तेव्हाही मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. एकूणच जीवाला जीव देणारे शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावंत शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. पूर्ण शिवसेनेच्यावतीने आणि ठाकरे कुटुंबियांच्यावतीने मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहतो, असे उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

मनोहर जोशी यांच्यासारखे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते हे त्यावेळीही होते, ते आजही आहेत. त्यामुळेच शिवसेना ही प्रत्येकवेळी संकटावर मात करून पुन्हा उभी राहात आहे. तर, मनोहर जोशी शिवसेना नेत्यांच्या पहिल्या फळीतील नेते होते. ते शिवसेना प्रमुखांचे विश्वासू सहकारी होते. या सर्वांपासून स्फुर्ती घेऊन शिवसैनिक काम करत आहेत. त्याचमुळे शिवसेनेला आज संपवण्याचा जरी प्रयत्न झाला तरी शिवसेना वाढत आहे. याचे कारण या सर्व नेत्यांनी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्षे शिवसेना रुजवण्यासाठी वेचली, ती मुळे धरून आज कार्यकर्ते शिवसेनेला उभारी देण्याचे काम करत आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -