घरताज्या घडामोडीपाकिस्तानमध्ये कधी बॉम्ब फोडणार याची वाट बघतोय, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

पाकिस्तानमध्ये कधी बॉम्ब फोडणार याची वाट बघतोय, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ऐन दिवाळीत लवंगी बॉम्ब फोडलाय, मी दिवाळीनंतर मोठा धमाका करणार असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर पाकिस्तानमध्ये कधी बॉम्ब फोडणार याची वाट बघतोय असा पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. काही जण फटाक्या फोडण्याचे वक्तव्य करत आहेत परंतु राजकीय फटाक्यांसाठी दिवाळीची गरज नसते असेही मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी म्हटलं आहे.

सोमवारी सकाळपासून राज्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी आपण नवाब मलिकांविरोधात मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे फडणवीस म्हणाले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिसंवादादरम्यान वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी पाकिस्तानमध्ये बॉम्ब फुटायची वाट बघतो आहे. तसेच मंत्रालयातील कार्यालयात जाऊन काम करत नाही. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले मंत्रालयात गेलो नाही म्हणून काम राहिले असे नाही. तर वर्षा निवासस्थानी असलेल्या कार्यालयातून सगळी काम होत आहेत. जे मंत्रालयात जाऊन पाट्या टाकत होते त्यांनी जे केलय ते निस्तरायचं आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

फडणवीस नक्की काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांचे आरोप फेटाळून लावत असताना फडणवीसांनी मलिकांनाच इशारा दिला आहे. नवाब मलिकांनी दिवाळीत लवंगी फटाका लावला आहे. मात्र मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे अंडर्वल्डशी संबंध आहेत त्यांनी माझ्याशी बोलू नये. माझ्याकडे नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे अनेक पुरावे आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांना हे पुरावे देणार असून दिवाळीनंतर मोठा धमाका करणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम, मानसोपचाराची आवश्यकता, प्रवीण दरेकरांची टीका


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -