घरदेश-विदेशबेफिकीरपणाचा कळस! कुत्र्याने चावा घेतल्याने गाठले रुग्णालय, अँटी रेबीजऐवजी दिली कोरोना लस

बेफिकीरपणाचा कळस! कुत्र्याने चावा घेतल्याने गाठले रुग्णालय, अँटी रेबीजऐवजी दिली कोरोना लस

Subscribe

झारखंडमधील पलामू जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेफिकीरपणाचा कळस गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नौदिहा गावातील एका व्यक्तीला शनिवारी कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे अँटी रेबीज लस घेण्यासाठी तो व्यक्ती पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला. मात्र या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याने अँटी रेबीज लस देण्याऐवजी त्या व्यक्तीला चुकून कोरोनाविरोधील दिल्याची घटना घडली आहे.

आरोग्य केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, राजू नामक ५० वर्षीय व्यक्तीने कोरोनाविरोधी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र कुत्रा चावल्याने तो अँटी रेबीज लस घेण्यासाठी रुग्णालयात गेला होता. मात्र निष्काळजी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला पुन्हा कोरोना लस दिली आहे. त्यामुळे राजू यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जातेय.

- Advertisement -

पलामू विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कुमार यांनी ही बाब अतिशय निष्काळजी असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता डॉ. एम.पी.सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय पथक तयार केले आहे. हे पथक पाटणला रवाना होत घटनेची चौकशी करणार आहेत. या पथकात डॉ. अनुप कुमार तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक दीपक कुमार यांचा समावेश आहे.

या प्रकरणाच्या चौकशीनंतर संबंधीत अहवाल प्राप्त होताच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. असं डॉ. अनिल कुमार यांनी स्पष्ट केले. कोरोनाविरोधी लस दिलेल्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

शाहरुख खान लेक आर्यनसाठी नव्या बॉडीगार्डच्या शोधात, मन्नतपासून दूर ठेवण्याचा प्लॅन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -