घरमहाराष्ट्रगुजरातमध्ये ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; 'उडता गुजरात' म्हणत नवाब मलिकांचं सूचक ट्वीट

गुजरातमध्ये ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; ‘उडता गुजरात’ म्हणत नवाब मलिकांचं सूचक ट्वीट

Subscribe

गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात एटीएसने तब्बल ६०० कोटींचं हेरॉईन जप्त केलं आहे. यावरुन राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना उडता गुजरात असं म्हटलं आहे. तसंच, त्यांनी एक सूचक इशारा दिला आहे.

नवाब मलिक हे गेले काही दिवस ड्रग्ज कनेक्शन आणि एसीबीची कारवाई यावर अनेक गंभीर आरोप, गौप्यस्फोट करत आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये पुन्हा एकदा ६०० कोटी रुपये किंमतीचं १२० किलो हेरॉईन जप्त केलं आहे. यावरुन नवाब मलिक यांनी सूचक ट्वीट केलं आहे. ‘पुन्हा एकदा गुजरात कनेक्शन… उडता गुजरात,’ असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे.

- Advertisement -

गुजरात एटीएसने मोरबीतील झिंजुडा गावातून ६०० कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त केलं आहे. एटीएसने ४ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींची चौकशी अजूनही सुरू आहे. हे हेरॉईन पाकिस्तानमधून पाठवण्यात आलं होतं, अशी माहिती मिळतेय. सोमवारी सकाळी ११ वाजता पोलीस महासंचालक याप्रकरणी पत्रकार परिषद घेणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, याच आठवड्यात, गुजरातमध्ये पोलिसांनी देवभूमी द्वारका आणि सुरतमध्ये ड्रग्ज जप्त केलं होतं. यावेळी तीन आरोपींनाही अटक करण्यात आली. देवभूमी द्वारका येथील विक्रेत्याकडून ८८.२५ कोटी रुपये किंमतीचे १७ किलो ड्रग्ज जप्त केलं होतं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -