घरदेश-विदेशGujarat Drugs : गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातून ६०० कोटींचे हेरॉईन जप्त, एटीएसच्या कारवाईत...

Gujarat Drugs : गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातून ६०० कोटींचे हेरॉईन जप्त, एटीएसच्या कारवाईत दोघांना अटक

Subscribe

गुजरात एटीएसने मोरबीतील जांजुरा गावातून ६०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. या प्रकरणी एटीएसने ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींची चौकशी अजूनही सुरू आहे. दरम्यान गुजरातमध्ये गेल्या महिन्यात ९ हजार कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. डीआरआयने गुजरातमधून जगातील सर्वात मोठ्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला होता. परंतु आत्ता जप्त करण्यात आलेल्या ६०० कोटी रुपयांच्या ड्रग्ज साठ्याचे संबंध पाकिस्तानचा ड्रग माफिया खालिद बख्शशी जोडले गेले आहे. पाकिस्तानातून हे अंमली पदार्थ भारतात आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुजरातचे पोलिस महासंचालक आज सोमवारी सकाळी ११.०० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. परंतु या घटनांमुळे गुजरात ड्रग्ज तस्कारीचे मोठे शहर बनतेय की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

 

- Advertisement -


या प्रकरणातील संशयित आरोपी खालिद हा थेट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जच्या खेपाची योजना दुबईमध्ये तयार करण्यात आली होती. पाकिस्तानी माफिया खालिदने जब्बार आणि गुलाम या दोन भारतीय तस्करांची दुबईतील सोमालिया कॅन्टीनमध्ये भेट घेतली होती. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

विशेष म्हणजे याआधीही पाकिस्तानी ड्रग माफिया खालिदने ड्रग्जची मोठी खेप भारतात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. याच आठवड्यात गुजरातमधील पोलिसांनी देवभूमी द्वारका आणि सुरतमध्ये  हेरॉइन ड्रग्जसह अनेक अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यावेळी तीन आरोपींनाही अटक करण्यात आली. देवभूमी द्वारका येथील विक्रेत्याकडून ८८.२५ कोटी रुपये किमतीचे १७ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

- Advertisement -

यापूर्वी कच्छा मुंद्रा बंदरात झालेल्या कारवाईत एक, दोन नव्हे, तर तीन हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ९ हजार कोटी रुपये आहे. या कारवाईत आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. या तस्कराशी संबंधित काही अफगाण नागरिकांचाही शोध सुरू आहे. या छाप्यानंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी याठिकाणी देखील छापेमारी अद्याप सुरु आहे.

अनेक दिवसांपासून आहे सर्च ऑपरेशन

मुंद्रा बंदर अदानी पोर्टच्या मालकीचे आहे. अदानी पोर्ट ही प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी आहे. दरम्यान डीआरआय आणि कस्टमच्या संयुक्त कारवाईत या बंदरावरून मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त केले होते. त्यासाठी अनेक दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू होते. या कारवाईदरम्यान मुंद्रा बंदरातील दोन कंटेनरच्या झडतीत नऊ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. यातून देशात अमली पदार्थांच्या तस्करीचे सर्वात मोठे रॅकेट बाहेर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरॉईनची वाहतूक करणारा कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका ट्रेडिंग कंपनीने आयात केला होता. या कंपनीने कंटेनरमध्ये टॅल्कम पावडर असल्याची बतावणी केली होती. परंतु गांधीनगर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या चाचणीत ज्याला टॅल्कम पावडर म्हटले जात आहे, ते प्रत्यक्षात हेरॉईन ड्रग्ज असल्याचे उघड झाले.

अफगाणिस्तानातून कंटेनर होते आले

यातील पहिल्या कंटेनरमध्ये १९९.५८ किलो हेरॉईन तर दुसऱ्या कंटेनरमध्ये ९८८.६४ किलो हेरॉईन सापडले. म्हणजेच एकूण २ हजार ९८८.२२ किलो हेरॉईन जप्त केले आहे. हे दोन्ही कंटेनर अफगाणिस्तानातील कंदहार येथील हसन हुसेन लिमिटेडने निर्यात केले होते. हे कंटेनर इराणच्या बंदर अब्बास बंदरातून आले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जगातील आतापर्यंत जप्त करण्यात आलेली हेरॉइनची ही सर्वात मोठी खेप आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -