घरमहाराष्ट्रUnseasonal Rain : अवकाळी पावसाचा अनेक जिल्ह्यांना फटका, मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान

Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा अनेक जिल्ह्यांना फटका, मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान

Subscribe

भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाला आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील जिल्ह्यांना बसला आहे.

मुंबई : भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाला आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील जिल्ह्यांना बसला आहे. मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, अंदाजे दोन हजार 716 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. (Unseasonal rain in Marathwada hit many districts)

अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. या अवकाळी पावसाचा शेकडो हेक्टरवरील ज्वारी, मका, बाजरी, फळबागांच्या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले आहे. यामध्ये आतापर्यंत 84 लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला असून 356 घरांची पडझड झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Water Shortage : राज्यात दोन हजार टँकरद्वारे पाणी पुरवठा, मे महिन्यात संख्या वाढण्याची शक्यता

हवामान विभागाचा इशारा…

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अवकाळी पावसाला आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून आता पुन्हा हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट वाढणार आहे. 13 आणि 14 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस कोसळणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर, राज्यातील अनेक भागांमध्ये आज शनिवारी (ता. 13 एप्रिल) रेड आणि उद्या रविवारी (ता. 14 एप्रिल) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

अवकाळीमुळे परभणीत दोघांचा मृत्यू…

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच आहे. पण त्याशिवाय, या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये वीज अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गंगाखेड तालुक्यातील ईळेगाव येथील 55 वर्षीय बाबुराव शेळके या शेतकऱ्याचा अंहगावर वीज पडून मृत्यु झाला आहे. तर, सोबत असणाऱ्या दोन महिला सुदैवाने बचावल्या आहेत. तसेच, सोनपेठ तालुक्यातील भाऊंचा तांडा येथील हरिबाई सुरनर यांचाही वीज पडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर, बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे वीज पडून एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा… Summer Special Trains : मध्य रेल्वेवर मुंबई ते थिवीम 32 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -