घरताज्या घडामोडीvaccination: लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांवर कडक निर्बंध, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

vaccination: लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांवर कडक निर्बंध, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

Subscribe

कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी कोरोनाप्रतिबंधक लसीकरण वेगाने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु अद्यापही दुसऱ्या लसीचा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधित लसीचा दुसरा डोस न घेणार्‍यांवर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याची वेळ आली तरी अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे वेळ येऊनही दुसरा डोस घेणार्‍यांवर काही बंधने आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली.

देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात लस शिल्लक आहे. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या राज्यात बर्‍यापैकी झाली आहे. पण दुसर्‍या डोसमध्ये बरेच जिल्हे मागे आहेत. राज्यात पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आणि दुसरा डोस घेतला नाही अशा लोकांची संख्या जवळपास दीड ते पावणे दोन कोटी आहे. लस उपलब्ध असतानाही हे लोक दुसरा डोस घेत नाहीत.त्यामुळे वेळ येऊनही दुसरा डोस घेणार्‍यांवर काही बंधने आणण्याचा विचार आहे. जेणे करून ते दुसरा डोस घेतील, असेही अजित पवार यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

ओमायक्रॉनबाबतचे गैरसमज केंद्र सरकारने दूर करावेत

ओमायक्रॉनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली आहे. संसर्गाबाबत वेगवेगळ्या प्रकारची मते ऐकायला मिळत आहे. डोंबिवलीतील रुग्ण होता तो बरा झाला आहे. या रुग्णामुळे इतर बाधित झाले नाहीत. ओमायक्रॉनबाबत समज, गैरसमज असून केंद्र सरकारने ते दूर करावेत असे अजित पवार म्हणाले.

लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांचा शोध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यमंत्रिमंडळ बैठक झाली. कोरोना आणि ओमिक्रॉनपासून राज्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर लसीकरण वेगानं करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेऊन दुसऱ्या लसीचा डोस वेळेत घेतलाच नाही. त्यांचा कॉल सेंटर आणि आरोग्य विभागाच्या मदतीने शोध घेऊन लसीकरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘मी पंतप्रधान मोदींसारखा नापास झालो नाही, माझं मार्कशीट पाहा’, कन्हैया कुमारचा पुण्यातून भाजपवर निशाणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -