घरमहाराष्ट्रनाशिकविनाहेल्मेट चालकास प्रवेश दिल्यास होणार गुन्हा दाखल

विनाहेल्मेट चालकास प्रवेश दिल्यास होणार गुन्हा दाखल

Subscribe

आस्थापनांचे मालमत्ता अधिकारी पोलिसांच्या रडारवर

नाशिक: शहरातील शासकीय व खासगी कार्यालयांच्या आवारात वारंवार सूचना देऊनही आणि समज व नोटीस बजावूनही विनाहेल्मेट दुचाकीचालकांना प्रवेश दिल्यास पोलीस थेट संबंधित मालमत्ता अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करणार आहेत. याप्रकरणी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आदेश दिले आहेत. नाशिक शहर वाहतूक शाखेचे भरारी पथक शहरातील विविध कार्यालयांना भेट देत पाहणी करत आहेत. त्यामुळे आता मालमत्ता अधिकार्‍यांना दुचाकीचालकांना हेल्मेट असेल तर प्रवेश द्यावा लागणार आहे.

हेल्मेट नाही, सहकार्य नाही या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नाशिक शहरातील प्रत्येक शाळा, कॉलेज, महाविद्यालय, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस, सर्व पार्किंग ठिकाणे, एम. आय. डी. सी. परिसर, शासकीय कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, लष्कर क्षेत्राच्या प्रवेशव्दार आणि पार्किंग ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित मालमत्ता अधिकार्‍यांनी दुचाकीचालकांवर नियंत्रण ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisement -

विनाहेल्मेट दुचाकीचालकास शासकीय व खासगी कार्यलयांच्या आवारात प्रवेश दिल्याचे आढळून आल्यास संबंधित मालमत्ता अधिकार्‍यास आठ दिवसांचा तुरुंगवास किंवा १ हजार २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेबाबत अधिसूचनेत उल्लेख करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखा युनिट एक ते चारनिहाय हेल्मेट नाही, सहकार्य नाही या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस अंमलदारांचे भरारी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक कार्यालयांच्या मुख्य प्रवेशव्दारावर सीसीटीव्ही लावला आहे की नाही हे पाहणी करत आहे.

विनाहेल्मेट दुचाकीचालक प्रवेश दिल्याचे आढळून आल्यास मालमत्ता अधिकार्‍यांना लेखी समज दिला जात आहे. तरीही, सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आल्यास १४९ प्रमाणे नोटीस बजावली जाणार आहे. तरीही, विनाहेल्मेट दुचाकीचालकांना प्रवेश दिल्यास पथक संबंधित व्यक्तींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -