घरताज्या घडामोडीKanhaiya Kumar: 'मी पंतप्रधान मोदींसारखा नापास झालो नाही, माझं मार्कशीट पाहा', कन्हैया...

Kanhaiya Kumar: ‘मी पंतप्रधान मोदींसारखा नापास झालो नाही, माझं मार्कशीट पाहा’, कन्हैया कुमारचा पुण्यातून भाजपवर निशाणा

Subscribe

ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेसमध्ये यावं आणि ज्यांना देश विकायचा आहे त्यांनी भाजपमध्ये जावं असा घणाघात काँग्रेस नेता कन्हैया कुमार याने केला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा नापास झालो नाही. तुम्ही माझे मार्कशीट पाहू शकता असा हल्लाबोल कन्हैयाने मोदींवर केला आहे. कन्हैया कुमार पुण्यात सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोपानिमित्त बोलत होते यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. पुण्यात येऊन कन्हैया कुमारने भाजपवर हल्लोबाल केला आहे.

काँग्रेस नेता कन्हैया कुमार पुण्यात एका कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त संवाद साधत होता. देशाचे संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचा हेलीकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. रावत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना कन्हैया कुमारने काँग्रेसचं कौतुक करत भाजपवर टीका केली आहे. काँग्रेस हा देशाला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. देश वाचवण्यासाठी काँग्रेसमध्ये यावं आणि ज्यांना हा देश विकायचा असेल त्यांनी भाजपमध्ये जावं. देशातील एक व्यक्ती जर रात्री टीव्हीवर येऊन काही बोलली तर त्याचा अर्थ तुमचे भले होणार असं नाही. असे वक्तव्य करत कन्हैया कुमारने थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

- Advertisement -

जे घर सोडून पळाले त्यांना कुटुंब कसं कळणार?

जे घर सोडून पळाले आहेत त्यांना कुटुंब कसे समजणार? असा खोचक सवाल कन्हैया कुमारने केला आहे. आपल्या मित्रांचे भले करण्याचे काम या देशात सुरु आहे. पंतप्रधान म्हणजे हा देश नाही आहे. पंतप्रधानांबद्दल कोणी वक्तव्य केलं तर त्यांना देशद्रोही ठरवण्यात येत आहे. आता कोणावरही युपीए लावून बोलती बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु हा भारत आहे असे कन्हैया कुमारने भाजपला सांगितले आहे. या देशावर इंग्रजांनी २०० वर्ष राज्य केलं त्यांनाही घालंवल तर तुम्ही कोण आहात? असा हल्लाबोल कन्हैया कुमारने केला आहे.

भाजपकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बदनामीसाठी

सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आज जगभरात १५१ व्या क्रमांकावर आहे. लोकशाही वाचवण्याची वेळ आपल्यावर आली आहे परंतु ही वेळ का आली? याचा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. सध्या देशात वेगळ्या पद्धतीचे राजकारण सुरु आहे. देशाला आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा होईल असे सुरुवातीला वाटले होते. परंतु भाजपकडून या तंत्रज्ञानाचा २०१२ पासून केवळ राजकीय फायद्यासाठी आणि बदनामीसाठी वापर करण्यात येत आहे. लोकशाही मूल्यांना भाजपने तिलांजली दिली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसला सत्तेत आणण्याची जबाबदारी जनतेची असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : MLC Election: राज्यात विधान परिषदेच्या २ जागांसाठी आज मतदान, भाजप-मविआत रस्सीखेच सुरु

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -