घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरVBA : सकाळी पक्ष प्रवेश संध्याकाळी उमेदवारी; वंचितकडून अफसर खान देणार इम्तियाज...

VBA : सकाळी पक्ष प्रवेश संध्याकाळी उमेदवारी; वंचितकडून अफसर खान देणार इम्तियाज जलील यांना टक्कर

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून (छ. संभाजीनगर) अफसर खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मंगळवारी (2 एप्रिल) सकाळी काँग्रेस नेते आणि मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अफसर खान यांनी स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

कोण आहेत अफसर खान?

छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मजबूत संघटन आहे. या संघटनेच्या बळावरच 2019 मध्ये एमआयएम आणि वंचित आघाडीचे इम्तियाज जलील येथून विजयी झाले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला एमआयएम-वंचित आघाडीने मागील निवडणुकीत ताब्यात घेतला. यात वंचित बहुजन आघाडी या कॅडरबेस असलेल्या पक्षाचा मोठा वाटा होता. पक्षाची हीच ताकद लक्षात घेऊन अफसर खान यांनी आज वंचितमध्ये प्रवेश केला. महापालिकेच्या राजकारणात सक्रीय असलेले अफसर खान हे काँग्रेसकडून महापलिकचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. शहरातील बेगमपुरासह मुस्लिम बहूल वार्डांमध्ये त्यांचे वर्चस्व आहे. शहर आणि जिल्ह्यातही त्यांचा संपर्क आहे, याचाच फायदा घेण्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीने अफसर खान यांना उमेदवारी दिली असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

वंचितकडून तीन मुस्लिम उमेदवार

वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत 24 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये धुळ्यातून अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली आहे. अब्दुल रहमान हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. केंद्रातील भाजप सरकारच्या सीएए कायद्याविरोधात त्यांनी राजीनामा देऊन निषेध केला होता.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पक्षाने अबुल हसन खान यांना उमेदवारी दिली आहे. आज वंचितची तिसरी यादी प्रसिद्ध झाली, यामध्ये अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते वंचितचे तिसरे मुस्लिम उमेदवार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : VBA Lok Sabha Candidates : अखेर वसंत मोरेंच्या गळ्यात वंचितकडून पडली उमेदवारीची माळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -