घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांना दिलासा! रेल्वेमार्फत भाजीपाला पार्सल सेवा पुन्हा सुरु होणार

शेतकऱ्यांना दिलासा! रेल्वेमार्फत भाजीपाला पार्सल सेवा पुन्हा सुरु होणार

Subscribe

गेल्या दोन वर्षांपासून लासलगाव येथून रेल्वे मार्गाने मुंबईकडे भाजीपाला घेऊन जाण्याची सुविधा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. ही सुविधा पुन्हा सुरु करण्यात यावी म्हणून स्थानिक शेतकरी आणि इतर व्यापारी वर्गाने खासदार डॉ.भारती पवार यांची भेट घेतली आणि या भेटीत भाजीपाला गोदावरी एक्सप्रेसद्वारे मुंबईत गेऊन जाता यावा, अशी सुविधा पुन्हा सुरु करण्याची विनंती केली. डॉ. भारती पवार यांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. भारती पवार यांनी पाठपुरावा करून भुसावळ येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लासलगाव येथील शिष्टमंडळ चर्चेकरिता भुसावळ येथे पाठवले. यात सकारात्मक चर्चा झाली आणि गुरुवार १९ डिसेंबर पासून ही भाजीपाला पार्सल सुविधा पूर्ववत होणार असल्याची माहिती भारती पवार यांनी दिली.


हेही वाचा – राज्यात दोन टप्प्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी होणार

- Advertisement -

लासलगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला रेल्वेने पाठवला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून काही तांत्रिक कारणास्तव ही भाजीपाला पार्सल सुविधा सर्वच गाड्यांसाठी बंद करण्यात आली होती. या संदर्भात परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी येथील पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी तातडीने दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली होती.


हेही वाचा – ठाकरे सरकारकडून शेतकरी, बेरोजगार, महिलावर्गाला अपेक्षा

- Advertisement -

भारती पवार यांनी भुसावळ येथील रेल्वेचे महाप्रबंधक एम.के. गुप्ता आणि वाणिज्य विभागाचे प्रमुख विनोद कुमार यांच्याशी संपर्क साधून ही पार्सल सुविधा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना दिली. लासलगाव येथून शिष्टमंडळ बुधवारी भुसावळ येथे पाठवण्यात आले होते. या शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुराशे ,बाळासाहेब सोनवणे, सनी पाठक, दत्तू सुराशे यांचा समावेश होता या शिष्टमंडळाने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि भारती पवार यांच्याशी चर्चा करून या अधिकाऱ्यांनी तातडीने पार्सल सुविधा सुरू करणार असल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली. गुरुवार, १९ डिसेंबर पासून भाजीपाला मुंबईकडे लासलगाव रेल्वे स्थानकांवरून विविध रेल्वेगाड्यांनी रवाना होणार असल्याने या सुविधेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सकाळच्या सत्रात असलेल्या रेल्वे गाड्यांनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात आणि सायंकाळच्या वेळी खवा देखील मुंबईकडे रवाना होण्यास आता सुरुवात होणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून लासलगाव रेल्वे स्थानकावरून भाजीपाला पार्सल सुविधा बंद असल्याची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून यात लक्ष घालण्याचे सांगितले होते. बुधवारी याच कारणासाठी शिष्टमंडळ देखील पाठविण्यात आले होते. त्यांना सकारात्मक प्रतिसाद अधिकाऱ्यांनी दिला असून ही सुविधा सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे.
-भारती पवार, खासदार, दिंडोरी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -