घरमहाराष्ट्रराज्यात दोन टप्प्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी होणार

राज्यात दोन टप्प्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी होणार

Subscribe

महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा सरकारकडे लागल्या आहेत. राज्यात यावर्षी अतिवृष्टी झाली. याशिवाय अवकाळी पाऊस देखील राज्यात तितकाच पडला. त्यामुळे त्याचा मोठा फटका शेतीचे पीके आणि शेतकऱ्यांना बसला. दोन दिवसांपासून नव्या सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनात तरी शेतकरी कर्जमाफीवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षासारख्याच काही घडामोडी लवकरच महाराष्ट्रात घडणार, अशी माहिती मिळत आहे. कारण राज्यात लवकरच कर्जमाफी होणार आहे. ही कर्जमाफी दोन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने एक पथक नेमले आहे. हे पथक दररोज राज्यभरातील शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढाव घेते. आधीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय काम केले आहेत, काय काम करायचे आहे त्याचबरोबर बँक आणि इतर खात्यांना देखील शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती देण्याची प्रक्रिया सध्या पथकाकडून सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफी दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. सध्याचे आर्थिक वर्ष संपण्याच्या आत म्हणजे एप्रिल २०२० पर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात कर्जमाफी केली जाणार आहे. तर एप्रिल २०२० नंतर दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफी केली जाणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारले असता राज्यातील आर्थिक परिस्थिती कशी आहे, कशाप्रकारे पैसे उभे करु शकतो आणि गेल्या सरकारने कर्जमाफी करताना ज्या चुका केल्या होत्या त्या न करता शेतकऱ्यांना कशाप्रकारे कर्जमाफी देता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच कर्जमाफी दोन टप्प्यांमध्ये देण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे. राज्यात अवकाळी पाऊस असेल किंवा अतिवृष्टी असेल या भागासाठी काही रक्कम या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमार्फत मंजूर केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -