घरताज्या घडामोडीउच्चभ्रूंच्या शाळेतील विद्यार्थ्यांची WhatsApp वर 'Gang Bang' आणि 'Rape'ची चर्चा

उच्चभ्रूंच्या शाळेतील विद्यार्थ्यांची WhatsApp वर ‘Gang Bang’ आणि ‘Rape’ची चर्चा

Subscribe

मुंबईतील उच्चभ्रू परिसरात असलेल्या एका आंतरराष्ट्रीय शाळेने आठ विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. कारण ऐकून हैराण व्हाल..

देशभरात सध्या सुरू असलेल्या बलात्कार, हत्या आणि अत्याचारांच्या घटनांमुळे समाजमन पुरते हललेले आहे. अल्पवयीन मुलांवर या गोष्टींचा कुठेतरी वाईट परिणाम होत आहे, असं दिसतंय. मुंबईतल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरातील एका आंतरराष्ट्रीय शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या शाळेने १३ ते १४ वयोगटातील ८ विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. कारण या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपल्या वर्गमित्रांवर हिंसक आणि लैंगिक टीका केल्या आहेत. वर्गातील दोन मुलींच्या पालकांनी (जे स्वतःला सेलिब्रिटी असल्याचे सागंतात) ग्रूपवरचे मेसेज वाचले आणि शाळेकडे याबद्दल तक्रार केली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेनंतर काही मुली इतक्या घाबरल्या आहेत की त्यांनी शाळेत जाण्यास नकार दिलाय.

अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या लैंगिक आणि हिंसक चर्चा

या विद्यार्थ्यांच्या १०० पानांच्या चॅट्समध्ये त्यांनी अनेकदा ‘gang bang'(सामूहिक सेक्स) आणि ‘rape'(बलात्कार) अशा शब्दांचा वापर केला आहे. तर ८ विद्यार्थ्यांनी अनेकदा आपल्या वर्गमित्रांची खिल्ली उडवत त्यांच्या वजनावरून आणि त्यांना समलिंगी संबोधून त्यांची खिल्ली उडवली आहे. काही पालकांनी माध्यमांसमोर या घटनेची खातरजमा केली आहे. मात्र शाळेने याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे. १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांचे फार विक्षिप्त रूप या चॅट्समधून दिसून येत आहे. आठपैकी एक विद्यार्थी वर्गातल्या मुलींवर अश्लील अशी लैंगिक टिपणी करत आहे, ज्यावर दुसरा विद्यार्थी त्याला पाठिंबा देताना दिसतोय. विद्यार्थ्यांचे त्यांच्याच वर्गातल्या मुलींबद्दल असलेले विकृत विचार या चॅट्समधून दिसून येत आहे. अनेकदा चॅट्समध्ये मुलींना ‘trash’ म्हणजे कचरा असे संबोधण्यात आले आहे. ‘should I go full on and kill her existence’ म्हणजे ‘मी पूर्णपणे जावून तिचे अस्तित्व संपवू का?’ ग्रूपमध्ये असलेल्या अशा मेसेजमधून विद्यार्थ्यांची मानसिकता दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -