घरताज्या घडामोडीमीटरचे चुकीचे रीडिंग घेणाऱ्या एजन्सीजवर कठोर कारवाई करणार, विजय सिंघल यांचा इशारा

मीटरचे चुकीचे रीडिंग घेणाऱ्या एजन्सीजवर कठोर कारवाई करणार, विजय सिंघल यांचा इशारा

Subscribe

वीज ग्राहकांच्या प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप आणि महावितरणच्या महसुलाचे नुकसान अजिबात खपवून घेतले जाणार नाही. असं म्हणत मीटरचे चुकीचे रीडिंग घेणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीजविरुद्ध महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाईसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शुक्रवारी दिला आहे.

सिंघल यांनी आज राज्यभरातील क्षेत्रीय प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते आणि उपविभागीय अधिकारी यांची मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वीज मीटरचे अचूक रीडिंग घेण्याची सूचना केली.

- Advertisement -

ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच वीजबिलाची आकारणी करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. त्यासाठी फोटो मीटर रीडिंगसाठी स्वतंत्र मोबाईल अप तयार करण्यात आले आहे. रीडिंग घेण्याची प्रक्रिया सोपी आणि वेगवान केली आहे. प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना चांगला मोबदला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे आणि फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाही, असे सिंघल यांनी ठणकावून बजावले आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग शंभर टक्के अचूकतेने घेतले पाहिजे. यामध्ये हयगय केल्यास महावितरणच्या महसूलाचे नुकसान होते. सोबतच या बिल दुरूस्तीचा वीज ग्राहकांना नाहक मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागतो.

- Advertisement -

हेही वाचा : अधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची यादी ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर, बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -