घरमहाराष्ट्रनागपूरVijay Wadettiwar : उपराजधानीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बट्टाबोळ...; अधिवेशनापूर्वी वडेट्टीवार कडाडले

Vijay Wadettiwar : उपराजधानीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बट्टाबोळ…; अधिवेशनापूर्वी वडेट्टीवार कडाडले

Subscribe

नागपूर : हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी होणाऱ्या आजच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. मात्र अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषद घेत विरोधकांनी सरकारला कात्रीत पडकण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, उपराजधानीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बट्टाबोळ झाला आहे. राज्यात शांतताभंग होत असल्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. (Law and order crisis in sub capital Investments are being affected due to unrest in the state Before the session Vijay Wadettivar was bitter)

हेही वाचा – NCP Vs NCP : अजितदादांच्या आमदारांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी; अनिल देशमुखांचा दावा

- Advertisement -

विजय वडेट्टीवारी म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे. परंतु पक्ष म्हणून तीन वेगवेगळ्या दिशेचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलेलं आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दंगली झाल्या आहेत. 2022 मध्ये दंगलीच्या तब्बल 8 हजार प्रकरणाची नोंद महाराष्ट्रात झालेली आहे. ही त्या वर्षातील सर्वाधिक नोंद असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाची आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार आल्यानंतर दंगली आणि बलात्काराच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे आपल्यात लक्षात येईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये म्हणजेच नागपूरमध्ये अधिवेशन होत आहे. पण या उपराजधानीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा संपूर्ण बट्टाबोळ झालेला आहे, असा आरोप करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, नागपूरची ओळख संत्रा नगरी म्हणून होती, पण आता चोरांची नगरी म्हणून म्हणावं का? अशी प्रकारची स्थिती या नागपूर शहरामध्ये सुरू आहे. दररोज साधारणत: 112 घडफोड्याच्या घटना विदर्भासह नागपूरमध्ये होत आहे. याचाच अर्थ या राज्याचं सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शांतताभंग होत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation: ‘यापुढे महाराष्ट्रात मराठे राहणार नाहीत…’; भुजबळ संतापले, मागासवर्ग आयोगावर घणाघाती टीका

जर महाराष्ट्राची अशीच ओळख होत असेल तर राज्यात गुंतवणूक कशी येईल? असा प्रश्न उपस्थित विजय वडेट्टीवार म्हणाले की, ज्या राज्यामध्ये दंगली, चोऱ्या आणि सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील, ज्या राज्याची समाजा-समाजामध्ये आणि धर्मा-धर्मात तेढ निर्माण करणारं राज्य म्हणून सत्ताधारी ओळख निर्माण करत आहेत. त्यामुळे त्याचा निश्चितपणे गुंतवणुकीवर मोठा परिणाम झालेला आहे आणि होत आहे, हे खेदाने सांगावं लागेल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -